ठाण्यातील ९ थरांच्या दहीहंड्या फोडल्या या गोविंदा पथकांनी

शहरात दोन दहीहंड्या ९ थरांच्या होत्या. या दोन्ही हंड्या फोडण्यात गोविंदा पथकांना यश आलेय. यात शिवसाई पथकाने मनसेची ११ लाख रुपये बक्षिसांची दहीहंडी ९ थर लावून फोडली. तर  वर्तकनगर येथे शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यात जय जवान पथकाने ९ थर रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 15, 2017, 08:27 PM IST
ठाण्यातील ९ थरांच्या दहीहंड्या फोडल्या या गोविंदा पथकांनी title=

ठाणे : शहरात दोन दहीहंड्या ९ थरांच्या होत्या. या दोन्ही हंड्या फोडण्यात गोविंदा पथकांना यश आलेय. यात शिवसाई पथकाने मनसेची ११ लाख रुपये बक्षिसांची दहीहंडी ९ थर लावून फोडली. तर  वर्तकनगर येथे शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यात जय जवान पथकाने ९ थर रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

ठाण्यातील नौपाडा येथे मनसेने उभारलेली हंडीमध्ये बोरीवलीच्या शिवसाई गोपाळ पथकाने फोडली. या गोविंद पथकानेही नऊ थर रचत ११ लाखांचे बक्षीस मिळवले. तर जय जवान गोविंदा पथकाने १ मिनिटे आणि ३ सेकंदात नऊ थरांचा मनोरा रचला.

टेंबी नाका, जांभळी नाका तसेच वर्तकनगर येथील आयोजकांनी यंदाच्या उत्सवात बक्षिसांची रक्कम कमी केली होती. मनसेच्यावतीने नौपाडा येथे आयोजित केलेल्या नऊ थरांच्या हंडीसाठी ११ लाखाचं बक्षीस ठेवण्यात आले होते. आतापर्यंत रंगलेल्या दहीहंडीच्या सोहळ्यात ठाणे परिसरात दोन मंडळानी नऊ थर लावल्याचे पाहायला मिळाले.

१ मिनिट ३ सेकंदात ९ थरांचा मनोरा