सांगलीला पुराचा धोका, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ

 मुसळधार पावसाने हाहा:कार उडवला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकणातील चिपळूण (Chiplun flood), महाड (Mahad flood) आणि खेड, संगमेश्वर येथे पूरस्थिती कायम आहे. आता सांगलीत पुराचा धोका वाढला आहे. (flood in Sangli)  

Updated: Jul 23, 2021, 08:47 AM IST
सांगलीला पुराचा धोका, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ title=
संग्रहित छाया

सांगली : राज्यात मुसळधार पावसाने हाहा:कार उडवला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकणातील चिपळूण (Chiplun flood), महाड (Mahad flood) आणि खेड, संगमेश्वर येथे पूरस्थिती कायम आहे. आता सांगलीत पुराचा धोका वाढला आहे. (flood in Sangli) येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्याने नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. आयर्विन पुलाची पाणीपातळी 38 फुटांवर पोहोचली आहे. शहरातील 50 कुटुंबांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. नदीकाठच्या उपनगरात पाणी शिरले आहे. तर अनेक नागरिकांनी स्वतः स्थलांतर सुरु केले आहे.

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्याने सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, दत्तनगर परिसर या भागात पुराच पाणी शिरल्याने नागरिकांत भितीचे वातावण पसरले आहे.कोयना धरण क्षेत्रात तुफान पाऊस; विसर्ग सुरू केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून 10 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग 

सातारा, महाबळेश्वर, कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाण्याच्या प्रचंड दाब धरणावर येत आहे. त्यामुळे कोयना धरणातून सकाळी 7.30 च्या सुमारास 10 हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे 6 दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले आहेत. धरणातून कोयना नदीत 10 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, सांगली, सातारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने काही नागरिकांना स्थलांतरीत करण्यात येत आहे. तर दुसरकीडे शेजारील कोल्हापूर येथेही पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. कोल्हापूर - पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. कोल्हापुरात अनेक भागात पुराचं पाणी घुसले आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठल्यानंतर  शहरातील त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये पुराच पाणी घुसू लागलं आहे. शहरातील शाहूपुरी भागात देखील जयंती नाल्याचे पाणी अनेक घरामध्ये शिरल आहे. पन्हाळा मार्गावर अडकलेल्या 22 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. भुदरगड मार्गावरदेखील अडकलेल्या 11 प्रवाशांची सुटका करण्यात यश आले आहे. 

कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या विसर्गातही वाढ करण्यात आला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याला 2019 सारख्या पूराचा फटका बसणार नाही. याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. मात्र, कृष्णानदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुराचा धोका जास्त वाढला आहे. दरम्यान, सांगली, सातारा जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने काही नागरिकांना स्थलांतरीत करण्यात येत आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या विसर्गातही वाढ करण्यात आला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याला 2019 सारख्या पूराचा फटका बसणार नाही. याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.