'राज्यात असंतोष...' भुजबळांपाठोपाठ नारायण राणेंचा अध्यादेशाला विरोध

Maratha Reservation : छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोध केला आहे.   

नेहा चौधरी | Updated: Jan 28, 2024, 12:25 PM IST
'राज्यात असंतोष...' भुजबळांपाठोपाठ नारायण राणेंचा अध्यादेशाला विरोध title=
Dissatisfaction in the state Narayan Rane oppose on Maratha Reservation decision followed by Bhujbal

Narayan Rane on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटीलसह लाख मराठा आंदोलनाच्या एल्गाराला अखेर यश मिळालं आहे. सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर प्रत्येक समाजातील नेते आपले मत स्पष्ट करत आहेत. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा सरकारवरच निशाणा साधलाय. एका समाजाचे सरकारकडून सगळे हट्ट पुरवण्याचं काम सुरू असून 54 लाख ओबीसीत आले तर धक्का लागणार नाही का? असा सवाल विचारत ओबीसींना धक्का मारून बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय. तसंच ओबीसी समाजही मतदान करतो हे विसरू नका असा इशारा भुजबळांनी सरकारला दिलाय. आता भुजबळपाठोपाठ केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला दर्शविला आहे. (Dissatisfaction in the state Narayan Rane oppose on Maratha Reservation decision followed by Bhujbal)

राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं राणेंनी ट्वीट म्हणजे X वर या सोशल मीडिया साइटवर स्पष्ट केलं आहे. या ट्विटमध्ये नारायण राणे म्हणाले की, मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्‍तर बोलणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. 

दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर 16 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप घेता येणार आहेत. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी बांधवांना जास्तीत जास्त हरकती घेण्याचं आवाहन केलंय. तर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी देखील उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं स्पष्ट केलंय. त्यातच आता नारायण राणे यांच्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.