Diwali 2022 : बिंधास्त नियम तोडा! पुढील 10 दिवस वाहतुक नियम तोडणाऱ्यांना कोणतंही चलान नाही

Diwali 2022 : पुढील 10 दिवस वाहतुक नियम तोडणाऱ्यांना कोणतंही चलान नाही; पालकमंत्र्यांचा अजब निर्णय 

Updated: Oct 19, 2022, 09:42 AM IST
Diwali 2022 : बिंधास्त नियम तोडा! पुढील 10 दिवस वाहतुक नियम तोडणाऱ्यांना कोणतंही चलान नाही title=
diwali 2022 No traffic fine or challan for next 10 days amid festive days in pune

Diwali 2022 : दिवाळीच्या (Diwali) खरेदीसाठी घराबाहेर पडायचं झालं, की आपले हात आधी मोबाईलमध्ये असणाऱ्या गुगल मॅप्सकडे वळतात. ठराविक अंतरावर जायचं असल्यास तिथे जाणारे रस्ते कसे आहेत, तिथे वाहतूक कोंडी तर नाही ना? या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आपण Google Maps चा आधार घेत असतो. पण, आता मात्र किमान दिवाळीच्या दिवसांमध्ये तरी हा त्रास दूर होणार आहे. (diwali 2022 No traffic fine or challan for next 10 days amid festive days in pune )

दिवाळीआधी (Diwali Pune) पुणेकरांसाठी (Pune) ही सर्वात मोठी आणि तितक्याच आनंदाची बातमी. ट्रॅफिक पोलीस दिवाळीच्या 10 दिवसांत कोणतंही चलान फाडणार नाहीयेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी ही माहिती दिली. नियम तोडणाऱ्या वाहनचालकांना सहसा चलान देण्यात येतं, पण त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वाहनांच्या रांगेतून सदर वाहनधारकाला बाजूला घेणं, त्याच्यावर कारवाई करणं या साऱ्यामध्ये (traffic) वाहतूक कोंडीही होते हेच टाळण्यासाठी दिवाळीच्या काळात चलान फाडणार नसल्याचं पाटील यांनी सांगितलं. 

अधिक वाचा : 'सर म्हणाले शाळा बंद होणार, मग मलाही ऊस तोडायला जावं लागेल....' विद्यार्थ्याने मांडली कैफियत

गेल्या काही दिवसांपासून दिवाळी खरेदीच्या निमित्तानं पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या. परिणामी गर्दी चुकवण्यासाठी म्हणून काही वाहनचालक पर्यायी मार्ग वापरत होते. यामध्ये वाहतुकीच्या नियमांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली होताना दिसली. पण, गर्दीचं प्रमाण पाहता यंत्रणांनाही कारवाई करणं जवळपास अशक्य असल्यामुळे अखेर पुढचे 10 दिवस या धर्तीवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं. 

दरम्यान, पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या पाहता याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पण, त्यासाठी पुणे मनपा आणि पोलीस आयुक्त अॅक्शन प्लान करत असल्याचं सांगत, मोठे नाले बांधण्यावर लक्ष द्या अशा सूचना पाटील यांनी दिल्या.