ऐन पावसाळ्यात कोकणातील आंबा कलमांना मोहोर आणि हापूसची फळधारणा; बदलत्या वातावरणाचा परिणाम

ऐन पावसाळ्यात आंबा कलमांना मोहोर आला आहे. वेंगुर्ल्यातल्या भोगवे गावात हापूसला फळधारणा झाली आहे. मोहोर टिकवून ठेवल्यास बागायतदारांना  फायदा होणार आहे. 

Updated: Sep 13, 2023, 11:44 PM IST
ऐन पावसाळ्यात कोकणातील आंबा कलमांना मोहोर आणि हापूसची फळधारणा; बदलत्या वातावरणाचा परिणाम title=

Konkan Alphonso Mangoes :  सतत बदलत्या वातावरणाचा परिणाम कोकणातल्या निसर्गातही पाहायला मिळत आहे. ऐन पावसाळ्यात सिंधुदुर्गात आंबा कलमांना मोहोर आला आहे. तर वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे, किल्ले निवती भागात हापूसची फळधारणा झाल्याचं चित्रं पहायला मिळतंय. यामुळे आंबाच्या सिजन लवकर सुरु होईल असे वर्तवले जात आहे. 

भर पावसाळ्यात कोकणात हापुस आंब्यांना मोहोर आल्याने सर्वांना कुतूहल वाटतंय हा मोहोर आंबा बागायतदारांनी आच्छादन टाकून टिकवून ठेवल्यास त्यांना मोठा फायदा होउ शकतो. 
कोकणात सतत बदलत्या वातावरणाचा परिणाम निसर्गातही पाहायला मिळत आहे. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडला असतानाच सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागात आंबा कलमांना मोहोर आला आहे. तर वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे गावात किल्लेनिवती भागात हापूसला आंबे आल्याचं चित्रं पहायला मिळत आहे. 

भर पावसाळ्यात कोकणात हापुस आंब्यांना मोहोर आल्याने सर्वांना कुतूहल वाटतं आहे. भर पावसाळयात आलेला मोहोर प्रगतशील आंबा बागायतदारांनी टिकवून ठेवल्यास त्यांना त्याचा मोठा फायदा होउ शकतो. त्यासाठी फवारण्या आणि आच्छादन करून मोहोर टिकवून त्यांची फळं बाजारपेठेत आल्यास बागायतदारांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.

आंबा पिकाचे नुकसान 

पाऊस लांबल्यानं त्याचा परिणाम कोकणातल्या भातशेतीवर झालाच, मात्र आता आंबा पीकावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पाऊस लांबल्यानं आंबा पीक लांबण्याची शक्यता वर्तवली जात होती. नोव्हेंबरमध्ये झाडांना मोहर येतो. यंदा मात्र, ऐन पावसाळ्यात आंबा पिकाला मोहोर आला आहे. 

एका आंब्याला 5 हजाराचा भाव, आंब्याची शाही बडदास्त

हा आंबा जपानमध्ये पिकवला जातो. आणि विकलाही जातो. या आंब्याच्या मोहरापासून पिकण्यापर्यंतचा काळ याची खूपच काळजी घेतली जाते. हा आंबा शेडनेटमध्ये पिकवला जातो हे पाहून तुम्हाला पहिला धक्का बसतो. आंब्याला मोहर लागल्यानंतर मोहरातील सर्वात चांगल्या कैरीच्या फळाची पुढील वाढीसाठी निवड केली जाते. त्यातल्या कमजोर कैऱ्या कापून टाकल्या जातात. एका झाडाला ठराविकच कैऱ्या राहतील याची काळजी घेतली जाते. निवडलेल्या कैरीच्या वाढीसाठी अत्यावश्यक सेंद्रीय खतं दिली जातात. फळमाशी लागू नये म्हणून आंब्याला एका जाळीत सुरक्षित ठेवलं जातं. एवढंच काय तर झाडाला फळांचं वजन वाटू नये म्हणून हे आंबे दोरीच्या सहाय्यानं टांगले जातात. आंब्याच्या वाढीसाठी आवश्यक तापमान नेटशेडमध्ये ठेवलं जातं. आंबा नैसर्गिकरित्या जेव्हा पिकतो तेव्हाट तो तोडून बाजारात नेला जातो. एकावेळी फारतर  वीस किंवा पंचवीस आंब्यांची तोडणी होते. पण हे पंचवीस आंबे बागायतदाराला लाख सव्वा लाख रुपये मिळवून देतात. आहे की नाही आंब्याची गंमतदार गोष्ट.