एकनाथ शिंदे यांची नवी खेळी, शिवसेनेच्या व्हीपला जशास तसे उत्तर

Maharashtra political crisis : शिवसेनेने बंडखोर आमदारांना व्हीप बजावल्यानंतर एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपली नवी खेळी खेळली आहे.  

Updated: Jun 22, 2022, 03:45 PM IST
एकनाथ शिंदे यांची नवी खेळी, शिवसेनेच्या व्हीपला जशास तसे उत्तर title=

मुंबई : Maharashtra political crisis : शिवसेनेने बंडखोर आमदारांना व्हीप बजावल्यानंतर एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपली नवी खेळी खेळली आहे. त्यांनी आता बंडच पुकारल्याचे दिसून येत आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी तसे ट्विट केले आहे.

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे त्यांनी याआधी ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी हे दुसरे ट्विट केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला आहे. त्यामुळे बंडाचे निषाण फडकवलेले आमदरात वर्षा बंगल्यावर संध्याकाळपर्यंत पोहोचणार का, याचीच उत्सुकता लागली आहे. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नवी खेळी खेळली आहे. आता शिवसेनेतील नवा वाद पुढे आला आहे.

शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी आमदारांना सूचना जारी करण्यात आल्या आहे. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर हा व्हीप जारी करण्यात आला आहे. पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजता तातडीची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना शिवसेनेकडून करण्यात आल्या आहेत.