तहसील कार्यालयातून EVM मशीन चोरली; पुण्यातील विचित्र घटना

पुण्यात एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. तहसूल कार्यालयात ठेवलेली EVM मशीन चोरीला गेली आहे. 

Updated: Feb 6, 2024, 05:12 PM IST
 तहसील कार्यालयातून EVM मशीन चोरली; पुण्यातील विचित्र घटना title=

Pune Crime News : सध्ये देशात सर्वत्र EVM मशीनच्या माध्यमातून मतदान केले जाते. मात्र, ईव्हीएम मशीनद्वारे पारदर्शक निवडणूक होत असा आरोप केला जातो. यामुळे अनेकजण निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करत.  EVM मशीनवरुन गदारोळ सुरु असतानाच पुण्यात एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे.  पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिस  EVM मशीन चोरणाऱ्याचा शोध घेत आहेत. 

लवकरच राज्यात निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. आगामी निडणुकांच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी सुरु आहे. अनेक ठिकाणी  EVM मशीनची डेमो चाचणी घेतली आहे.  पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले होते.  येथे ठेवलेल्या 40 EVM मशिन्सपैकी एकच डेमो युनिट अज्ञात चोरट्यांनी चोरले आहे.   चोरीला गेलेली मशीन प्रशिक्षणासाठी असल्याचं पुरंदर तहसीलच्यावतीने सांगण्यात आले.अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तुटलेल्या स्थितीत आढळून आले.  सासवड तहसील कार्यालयाने ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सासवड पोलिस स्टेशनमध्ये काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 

भीम आर्मीच ईव्हीएम विरोधात आंदोलन

भीम आर्मीच्या वतीने आज ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात आले. सिएसएमटी ते मंत्रालय जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी स्टेशन बाहेर ताब्यात घेऊन आझाद मैदानात आणून सोडले. ईव्हीएम मध्ये घोटाळा करून मोदी सत्तेत येत आहेत. मतपत्रिकेवर येणारी निवडणूक घ्यावी अशी मागणी भीम आर्मी करत आहे. 

ईव्हीएमवरुन संजय राऊत यांची टीका

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केला. देशातील सद्यस्थिती पाहता ईव्हीएमच्या मदतीने भाजपला 400 पार जागा मिळाल्या तर राज्यघटना बदलतील. 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन नव्या राज्यघटनेनुसार केला जाईल असा गंभीर आरोप राऊतांनी केला होता. नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारीही सुरू असल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी केला होता.