बिबट्यामुळे बळी गेलेल्या कोमलच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

सटाणा तालुक्यातील तळवाडे भामेर गावात नरभक्षक बिबट्यामुळे बळी गेलेल्या अडीच वर्षांच्या कोमल रामदास यांच्या कुटुंबियाना शासनाकड़ूंन आठ लाख रूपायांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Updated: Oct 29, 2017, 03:38 PM IST
बिबट्यामुळे बळी गेलेल्या कोमलच्या कुटुंबियांना आर्थिक मदत title=

नाशिक : सटाणा तालुक्यातील तळवाडे भामेर गावात नरभक्षक बिबट्यामुळे बळी गेलेल्या अडीच वर्षांच्या कोमल रामदास यांच्या कुटुंबियाना शासनाकड़ूंन आठ लाख रूपायांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी बळी गेलेल्या बलकाच्या कुटुंबियांची भेट घेत एक लाख रूपायांची तात्काळ मदत दिली. तर उर्वरित रक्कम कोमलच्या वाडिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. 

मागील आठवड्यात मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास नरभक्षक बिबट्यानं हल्ला चढवत अडीच वर्षाच्या कोमलला उचलून नेलं होतं. घटनास्थळावर कोमलचं शिर सापडलं होतं. अशी घटना पुन्हा घडू नये अशा सूचना यावेळी डॉ. भामरे यांनी वनविभागाला दिल्या आहेत.