बैलगाडी स्पर्धेला गालबोट, बैल उधळला आणि 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन...

Bullock Cart Race in Chiplun :  बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. आता गावागावत या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, चिपळूण तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी स्पर्धेला गालबोट लागले आहे. स्पर्धेदरम्यान, बैल उधळल्याने एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: May 19, 2023, 09:20 AM IST
बैलगाडी स्पर्धेला गालबोट, बैल उधळला आणि 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या अंगावरुन... title=
संग्रहित छाया

Bullock Cart Race in Chiplun : चिपळूण तालुक्यातील कळमुंडीमध्ये बैलगाडी स्पर्धेला गालबोट लागले आहे. अंगावरुन बैलगाडा गेल्यामुळे चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. उधळलेल्या बैलाने 5 वर्षांच्या मुलाला तुडवल्याने त्याच्यावर कराडमधील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. जखमी झालेला चिमुकला चिपळूणमधील कोंढे गावातील रहिवासी आहे. तो बैलगाडा स्पर्धा पाहण्यासाठी आली होता. (Bailgada Sharyat in Maharashtra) दरम्यान, जोखीम पत्करुन होणारी गर्दी हा चिंतेचा विषय झाला आहे. आता तर बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आणखी चिंता वाढली आहे.

महाराष्ट्र सरकारने बैलगाडी शर्यतीबाबत कायदा तयार केला. या कायद्याला आणि  बैलगाडी शर्यतीवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारचा हा कायदा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात बैलगाडा मालकांनी जल्लोष केला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी बैलगाडी स्पर्धा लोकांच्या जीवावर बेत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

असाच एक धक्कादायक प्रकार  चिपळूण तालुक्यातील घटनेवरुन समोर आली आहे. स्पर्धेदरम्यान पाच वर्षांच्या मुलाच्या अंगावरुन बैलगाडा गेल्यामुळे चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कळमुंडीमध्ये रविवारी 14 तारखेला बैलगाडा स्पर्धा पार पडली. परंतु, या बैलगाडी स्पर्धेला गालबोट लागलेय. बैलगाडी स्पर्धेच्या दरम्यान बैल उधळला आणि लहान मुलाच्या अंगावरुन बैलगाडी गेली. यात चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. उधळलेल्या बैलाने लहान मुलाला तुडवले. त्यामुळे तो जखमी झाला. या धक्कादायक प्रकाराने हळहळ व्यक्त होत आहे.

कल्याणमध्ये 15 वर्षांच्या मुलाचा सर्प दंशाने मृत्यू

दरम्यान, कल्याणमध्ये 15 वर्षीय मुलाचा सर्प दंशाने दुर्दैवी मृत्यू झालाय. अमित सोनकर असे या मुलाचं नाव आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. सुदर्शन कॉलनी परिसरात राहणाऱ्या अमितला एका विषारी सापाने दंश केला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. महापालिकेच्या रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने अमित याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. त्यामुळे आज अमितच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्याला घेराव घालत या मृत्यू प्रकरणी जाब विचारात याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.

 मात्र, अमितच्या कुटुंबीयांचे आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावले. सर्प दंश झालेल्या अमितला उपचारार्थ लस द्यावी लागते ती दिली होती. मात्र आयसीयु सुविधा नसल्याने त्याला पुढील उपचारासाठी कळवा येथे हलवण्यात आल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.