भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन झाले. 

Updated: Nov 28, 2019, 01:06 PM IST
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन title=

जळगाव : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन झाले. ते जळगाव जिल्हा भाजप आधी जिल्हाध्यक्ष होते. उदय वाघ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अमळनेर येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पत्नी स्मिता वाघ या विधान परिषदेच्या सदस्य आहेत. उदय वाघ हे सहा वर्षे जळगाव जिल्हा भाजपचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात जळगाव जिल्ह्यात भाजपने चांगले संघटन उभे केले होते.  त्यांच्या पश्चात पत्नी स्मिता वाघ, दोन मुली, जावई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कुटुंबीय नातेवाईक, भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने रुग्णालय आणि घरी गर्दी होती.

उदय वाघ हे स्नान करण्यासाठी गेले होते. ते स्नानगृहातून २० मिनिटे बाहेर न आले नव्हते. दरम्यान, त्यांची मुलगी सासरी निघण्यासाठी तयार झाली होती. वडिलांना सांगून ती बाहेर पडणार होती. मात्र, आपल्या वडिलांचा आवाज आला नाही तसेच त्यांचा काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने शंका आली. त्यावेळी दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्काळ रुग्णालयाद हलविण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी उदय वाघ यांचे नाव एकदम चर्चेत आले होते. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी ही उमेदवारी बदलून आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. त्यावेळी गिरीश महाजन यांच्यासमोर जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये भाजपच्या सभेत तुफान राडा झाला होता. भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार बीएस पाटील यांना व्यासपीठावरच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.