नाशिकातील ५ बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस

शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याचे प्रकरण ५ बाजार समित्यांना भोवले आहे. जिल्हा उपनिबंधकांनी या पांचही बाजार समित्यांना बरखास्त का करु नये, अशी नोटीस बजावली आहे. नोटीस बाजाविण्यात आलेल्यांमध्ये मनमाड, येवला, मालेगाव, उमराने आणि देवळा या बाजार समित्यांचा समावेश आहे. या बाजार समित्यांत २०  व्यापाऱ्यांनी १४९९ शेतकऱ्यांचे सुमारे ५ कोटी रुपये थकविले आहेत.

Updated: Apr 28, 2018, 02:47 PM IST
नाशिकातील ५ बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस title=

नाशिक : शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याचे प्रकरण ५ बाजार समित्यांना भोवले आहे. जिल्हा उपनिबंधकांनी या पांचही बाजार समित्यांना बरखास्त का करु नये, अशी नोटीस बजावली आहे. नोटीस बाजाविण्यात आलेल्यांमध्ये मनमाड, येवला, मालेगाव, उमराने आणि देवळा या बाजार समित्यांचा समावेश आहे. या बाजार समित्यांत २०  व्यापाऱ्यांनी १४९९ शेतकऱ्यांचे सुमारे ५ कोटी रुपये थकविले आहेत.

चौदाशेहून अधिक शेतकऱ्यांच्या पाच कोटी रुपयांची देणी न देणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात  नाशिक जिल्हा उपनिबंधकांनी पाच बाजारसमित्यांना बरखासतीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील देवळा मनमाड येवला मालेगाव उमराणे याभागातील या बाजारसमित्यांमध्ये वारंवार ताकीद देऊनही व्यापारी आणि बाजारसमित्या फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे . १४ मेपर्यंत खुलासा बजावणीत आलेल्या नोटीस नमुद केले आहे. नाहीतर बरखास्त करण्याचा पावित्रा सहकार विभागाने घेतला आहे.