१ लाख मराठा मोर्चेकरांना मोफत जेवणाची व्यवस्था

मराठा समाजातर्फे मराठा समाजासाठी आरक्षणासहित विविध प्रलंबित मागण्यासांठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा मूक क्रांती मोर्चे काढण्यात येत आहेत. याच मालिकेतील शेवटचा महामोर्चा मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर हरियाणा आणि गुजरात राज्यातूनही मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती मोर्चाच्या संयोजकांनी दिली होती.

Updated: Aug 8, 2017, 09:19 PM IST
१ लाख मराठा मोर्चेकरांना मोफत जेवणाची व्यवस्था title=

मुंबई : मराठा समाजातर्फे मराठा समाजासाठी आरक्षणासहित विविध प्रलंबित मागण्यासांठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा मूक क्रांती मोर्चे काढण्यात येत आहेत. याच मालिकेतील शेवटचा महामोर्चा मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर हरियाणा आणि गुजरात राज्यातूनही मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती मोर्चाच्या संयोजकांनी दिली होती.

मुंबईत होणाऱ्या या मोर्चासाठी सातारा जिल्ह्यातील लाखो मराठा समाजाचे बांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे मुंबईत जाणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथील मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांना ८ आणि ९ ऑगस्ट रोजी मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. वाई येथील आराम हॉटेलमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलचे मालक विजयराव यादव यांनी एक दिवस जातीसाठी म्हणून ही व्यवस्था केली आहे. एका वेळेला येथे २,५०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी २०० हून अधिक कर्मचारी सज्ज झाले आहेत. २ दिवस मोफत नाष्टा आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे.