ज्येष्ठ साहित्यिक भीमराव गस्ती यांचे दीर्घ आजारानं निधन

ज्येष्ठ साहित्यिक भीमराव गस्ती यांचं आज कोल्हापूरात दीर्घ आजारानं निधन झालं.  ते ६७ वर्षांचे होते.  

Updated: Aug 8, 2017, 10:05 AM IST
ज्येष्ठ साहित्यिक भीमराव गस्ती यांचे दीर्घ आजारानं निधन title=

कोल्हापूर : ज्येष्ठ साहित्यिक भीमराव गस्ती यांचं आज कोल्हापूरात दीर्घ आजारानं निधन झालं.  ते ६७ वर्षांचे होते.  

गस्ती यांनी देवदासी प्रथा नष्ट व्हावी यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. देवदासी महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी 'उत्थान' ही सामाजिक संस्था सुरू केली. बेळगावमधील यमुनापूर इथं या संस्थेचं काम चालतं. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार होता. 

बेरड आणि आक्रोश या त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले. सांजवारा हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते. यमुनपापूरमध्येच सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.