जितेंद्र जगतापच्या आत्महत्येला दीपक मानकर जबाबदार, कुटुंबियांचा आरोप

पुणे पोलीस दलातील गनमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या शैलेंद्र जगताप यांचा भाऊ जितेंद्र जगताप यानं रेल्वेखाली आत्महत्या केलीय.

Updated: Jun 3, 2018, 04:49 PM IST

पुणे : पुणे पोलीस दलातील गनमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या शैलेंद्र जगताप यांचा भाऊ जितेंद्र जगताप यानं रेल्वेखाली आत्महत्या केलीय. शनिवारी दुपारी ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे या आत्महत्येस पुण्यातील माजी उपमहापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर जबाबदार असल्याचा आरोप जगताप यांच्या कुटुंबीयांनी केलाय. जितेंद्र जगताप यांनी त्याबाबतची चिठ्ठी लिहून ठेवल्याचं त्यांनी म्हटलंय. जगताप आणि मानकर यांच्यामध्ये एका भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात वाद होते. त्यातून मानकर यांनी धमकावल्यामुळे जितेंद्र जगताप यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केलाय. याप्रकरणी पुणे रेल्वे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यात दीपक मानकर यांच्यासह तिघांवर संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मानकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.