कुत्रा आणि कोल्हा चावल्यामुळे 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

  कोल्ह्याच्या चाव्यामुळं रेबीज झालेल्या १० वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 12, 2018, 08:44 PM IST
कुत्रा आणि कोल्हा चावल्यामुळे 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू  title=

कोल्हापूर :  कोल्ह्याच्या चाव्यामुळं रेबीज झालेल्या १० वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

ही घटना कोल्हापुरातल्या राशिवडे गावात घडलीय. दक्ष संग्राम पाटील असं दुर्देवी मुलाचं नाव असून कोवळ्या जीवाच्या निधनानं संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राशीवडे इथं रहाणा-या दहा वर्षीय दक्षचा कुत्रानं चावा घेतला होता.

त्यावेळी दक्षच्या कुटुंबीयांनी रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन दिलं होतं. त्यानंतर दक्ष आपल्या मित्रांसोबत घराशेजारील उसात खेळत असताना, त्याच्या  टाचेला कोल्ह्यानं चावा घेतला. आपण ही बाब घरी सांगीतली तर ओरडा बसेल या भितीनं त्यानं गोष्ट घरी सांगितलीच नाही. तर  काच पायाला लागल्याचं कुटुंबीयांना खोटी माहिती दिली.

त्यामुळं  कुटुंबीयांनी त्याच्यावर त्याच पद्धतीचे उपचार केले. हे झाल्यानंतर दक्ष दररोज शाळेत जात होता, अंगणात खेळत बागडत होता. पण अचनाक दक्षमध्ये रेबीजची लक्षण जाणवु लागली आणि बघता बघता दक्षचा बळी गेला. रेबीजची लक्षण दिसत दिसल्यानंतर दक्षच्या वडीलांनी त्याला तात्काळ सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.. त्याला अंधार खोलीत ठेवण्यात आलं...आणि त्याठिकाणाहूनच तो वडिलांना आर्त हाक मारत होता.. 

कोवळ्या दक्षचा रेबीजन बळी गेल्यानं त्याचं अख्ख कुटुंब दुखातुन सावरताना दिसत नाहीए. पण दुसरीकडं पालकांनी आपल्या मुलाकडं विषेश लक्ष देवुन त्याचा साभाळ केला पाहिजे असं अवाहन दक्षचे घरचे करत आहेत. कुत्रा चावल्यानंतर कोल्ह्यानं देखील आपल्या पायाचा चावा घेतलाय हे दक्षनं दक्षता घेत कुटुंबीयांना सांगीतल असत तर, दक्षचा जीव वाचला असता. त्यामुळं पालकांनी आपल्या मुलांना विश्वासात घेवुन त्याच्यासोबत कोणती घटना घडली आहे का ? हे वारंवार विचारलं पाहिजे, तरच आपली मुलं सुरक्षीत रहातील.