कोल्हापूरः इंटरव्ह्यूचा कॉल संपला अन् त्याने जीवन संपवले, 4 पानांच्या चिठ्ठीने गूढ उकलले

Kolhapur Youth Suicide: जीवनात अपयशी झाल्याने तरुणाने सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच कोल्हापुरातील कोपर्डे गावातील दुर्दैवी घटना

प्रताप नाईक | Updated: Sep 12, 2023, 12:40 PM IST
कोल्हापूरः इंटरव्ह्यूचा कॉल संपला अन् त्याने जीवन संपवले, 4 पानांच्या चिठ्ठीने गूढ उकलले title=
kolhapur news 22 yeas old youth dies by suicide in depression

प्रताप नाईक, झी मीडिया

Kolhapur Youth Suicide: मी जीवनात अयशस्वी झाल्याने आत्महत्या करत आहे, अशी सुसाइड नोट लिहून अवघ्या २२ वर्षांच्या तरुणाने जीवन संपवले आहे. कोल्हापूरात ही खळबळजनक घटना घडली आहे. नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केल्याने आई-वडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

मी जीवनात अयशस्वी झाल्याने मी आत्महत्या करत आहे अश्या पद्धतीचे ४ पानी सुसाईड नोट लिहून लोखंडी हुकला दोरी बांधून कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील एका उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंथन शरद बेंडकळे वय २२ असे या मृत युवकाचे नाव असून या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील कोपार्डे येथे राहणारा मंथन बेंडकळे हा बी.टेकच शिक्षण घेऊन पदवीधर झाला होता. तो गेल्या काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. पण इंटरव्ह्यूमध्ये मिळत असलेल्या अपयशाने तो डिप्रेशनमध्ये गेला होता. रविवारी दुपारी त्याला कंपनीचा नोकरीसाठी कॉल आल्याने ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी तो घरी एकटाच होता. 

आईवडील ढेबेवाडी येथे गावी गेले होते. तर भाऊ कुंभी कारखान्यावर गेला. यावेळी मंथनचे आईवडील त्याला चार वाजल्यापासून फोन करत होते पण तो उचलत नव्हता. मात्र परिक्षेत व्यस्त असेल म्हणून आई वडिलांनी दुर्लक्ष केले. रात्री 10 च्या सुमारास भाऊ सागर घरी आला यावेळी वरच्या मजल्यावर मंथनने लोखंडी हुकाला दोरीने गळफास लावून घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने नातेवाईक व मित्रांना आणि पोलीसांना याबाबतची माहिती दिली. 

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर सी पी आर रुग्णालयात पाठवला. दरम्यान, आत्महत्येपूर्वी मंथनने सुसाईड नोट लिहिली होती ज्यामध्ये आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नका. मी जीवनात अपयशी झाल्याने निराश होऊन आत्महत्या केली आहे. यापूर्वी मी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. असेही मंथने चिठ्ठीत लिहले होते. या घटनेमुळे आई-वडिलांना जोरदार धक्का बसला असून कोपर्डे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.