चिमुकल्याच्या धाडसाची कमाल, ऑफिसमध्ये घुसलेल्या बिबट्याला केलं जेरबंद

leopard: चिमुरडा अलगद ऑफिसबाहेर गेला आणि बाहेरुन दरवाजाची कडी लावून घेतली. ऑफिसमध्ये असलेल्या सीसीटीव्हीने हा सारा प्रसंग रेकॉर्ड केला. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 5, 2024, 09:26 PM IST
चिमुकल्याच्या धाडसाची कमाल, ऑफिसमध्ये घुसलेल्या बिबट्याला केलं जेरबंद  title=
Leopord Found In Nashik

Leopard: छोट्याश्या ऑफिसमध्ये लहान मुलगा मोबाईलवर खेळतोय. ऑफिसमध्ये दुसर कोणीच नाहीय. बाहेरुन बिबट्याचा आवाज चिमुकल्याला ऐकू येतोय. तो बिबट्या ऑफिसच्या दिशेनेच येतोय हे त्याला कळतंय. पण आपल्याला ओरडायचं नाहीय, गोंधळ करायचा नाहीय हे त्या चिमुकल्याला समजलंय. काही क्षणात बिबट्या ऑफिसमध्ये घुसला. त्यानंतर चिमुरडा अलगद ऑफिसबाहेर गेला आणि बाहेरुन दरवाजाची कडी लावून घेतली. ऑफिसमध्ये असलेल्या सीसीटीव्हीने हा सारा प्रसंग रेकॉर्ड केला. 

मोहित विजय अहिरे असं या चिमुरड्याचं नाव आहे. त्याने झी 24 तासशी संवाद साधताना त्यावेळी काय घडलं याची माहिती दिली. मी ऑफिसमध्ये बसलो होतो. बिबट्याचा आवाज मला ऐकू येत होता. बिबट्या माझ्या समोर आला मी पाहिला. बिबट्याला न घाबरता बाहेर आलो. आणि बाहेर जाऊन सर्वांना सांगितलं, असे मोहितने झी 24 तासशी बोलताना सांगितले. 

वनविभागाकडून सुरु होता शोध

राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून पळालेल्या बिबट्याचा शोध वनविभागाकडून सुरु होता. सचिन असं पळालेल्या बिबट्याचं नाव आहे. वनविभागाचे कर्मचारी, फायर ब्रिगेडचे जवान आणि प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी असे 200 जण बिबट्याचा शोध होते. खबरदारीचा उपाय म्हणून कात्रज प्राणी संग्रहालय आज बंद ठेवण्यात आले होते. द

रम्यान पहाटे बिबट्याच्या पायाचे ठसे प्राणी संग्रहालयातील पाणवठ्याजवळ आढळले होते. सीसीटीव्हीमध्ये ही दृश्यं कैद झाली होती मात्र बिबट्याला पकडण्यात प्रशासनाला यश येत नव्हते. बिबट्याला पकडण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापर करण्यात आला होता.