लोकसभा निवडणूक २०१९ : ठाणे लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम

२९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

Updated: Mar 26, 2019, 07:07 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : ठाणे लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम title=

ठाणे : या मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे विरुद्ध राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात लढत होणार आहे. राजन विचारे यांनी महापौर, आमदार, खासदार असा प्रवास केला आहे. शिवसेनेत असताना आनंद परांजपे ठाणे आणि कल्याणचे खासदार होते. २०१४ च्या निवडणुकीत ठाण्यातून राष्ट्रवादीचे संजीव नाईक रिंगणात होते. राजन विचारे यांनी त्यांचा पराभव केला. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या निवडणुकीत सेनेच्या गोटातून विजयी झालेले आनंद परांजपे यांना २०१९ मध्ये राष्ट्रवादीने ठाण्यातून उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने ठाण्यातून मल्लिकार्जुन पुजारी यांना उमेदवारी दिली आहे. २९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

२०१४ चा निकाल

२०१४ च्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे दीड लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक ठाण्यातून विजयी झाले होते.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

 

उमेदवार

 पक्ष

 मतदान

राजन विचारे शिवसेना 595364
संजीव नाईक राष्ट्रवादी 314065
अभिजीत पानसे मनसे 48863
संजीव साने आप 41535
नोटा नोटा 13174