लोकसभा निवडणूक २०१९ : बुलडाणा मतदारसंघातील 'रणसंग्राम'

लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे.

Updated: Apr 7, 2019, 08:22 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : बुलडाणा मतदारसंघातील 'रणसंग्राम' title=

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता.

या निवडणुकीत बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेने प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली आहे. प्रतापराव जाधव यांचा सामना राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांच्याशी आहे. वंचित बहुजन आघाडीकडून बुलडाण्यामध्ये बळीराम सिरस्कर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

२०१४ निवडणुकीचे निकाल

२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये बुलडाण्यातून शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या कृष्णराव इंगळेंचा १,५९,५७९ मतांनी पराभव केला होता.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

पक्ष

मिळालेली मतं

प्रतापराव जाधव शिवसेना ५,०९,१४५
कृष्णराव इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस ३,४९,५६६
अब्दुल हफीज बसपा ३३,७८३
बाळासाहेब दराडे अपक्ष २९,७९३
नोटा   १०,५४६

रणसंग्राम | बुलडाणा | काय आहे मतदारांच्या मनात?

रणसंग्राम | बुलडाणा | आवाज तरुणांचा