Loksabha Election 2024 : 'बच्चू, हिंमत असेल तर...' संजय राऊतांकडून श्रीकांत शिंदे यांना खुलं आव्हान

Loksabha Election 2024 : 'संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली तरीही ही बच्चम मंडळी... संजय राऊत स्पष्ट शब्दांत काय म्हणाले? वाचा सविस्तर वृत्त  

सायली पाटील | Updated: Apr 4, 2024, 10:43 AM IST
Loksabha Election 2024 : 'बच्चू, हिंमत असेल तर...' संजय राऊतांकडून श्रीकांत शिंदे यांना खुलं आव्हान title=
Loksabha Election 2024 Shivsena sanjay raut on political happenings latest update bacchu kadu

Loksabha Election 2024 Sanjay Raut : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना विद्यमान खासदार (Shrikant Shinde) श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. नेहमीच्याच शैलीत राऊतांनी शिंदेंवर टीकेची झोड उठवत अद्यात त्यांची उमेदवारी जाहीर कशी झाली नाही, असा खोचक सवाल केला. 

भिवंडीतील जागेवर (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस लढणार अशी माझी माहिती असल्याचं सांगत सांगलीच्या जागेवरील चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला. सांगलीमध्ये खुद्द (shivsena) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळं तिथं उमेदवार मागे घेण्याचा प्रश्नच नसल्याचं म्हणत त्यांनी याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. पुढं श्रीकांत शिंदे यांच्यावर राऊतांनी तोफ डागली. 

महायुतीचा (Mahayuti) उमेदवार जिंकून येणार अशा आशयाचं वक्तव्य करणाऱ्य़ा कल्याणची (Kalyan ) खासदारकी भूषवणाऱ्या श्रीकांत शिंदे यांन अद्याप उमेदवारी जाहीर का झाली नाही, असा खोचक प्रश्न राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना मांडला. 'तुम्ही विद्यमान खासदार आहात. मुळात ही खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळं मिळाली. पण नव्या युतीमध्ये तुम्ही स्वत:ची उमेदवारीही जाहीर करु शकला नाहीत. जिंकण्याची भाषा करताय... पण, अब दिल्ली बहुत दूर है बच्चू.. आता तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही', असं म्हणत त्यांनी शिंदेंवर घणाघात केला.  

हेसुद्धा वाचा : RBI च्या एका निर्णयामुळं Home Loan चा हप्ता वाढणार? लवकरच होणार घोषणा 

'आमची सामान्य कार्यकर्ती, वैशाली दरेकर तिथं अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. हा लोकांनी घेतलेला निर्णय असून, कल्याण डोंबिवली मतदार संघात गद्दार, अहंकार आणि पैशांची मस्ती याचा पराभव वैशाली दरेकर ही एक सामान्य शिवसैनिक, गृहिणी 100 टक्के करणार. इथं मस्ती चालणार नाही...' असा आश्वस्त करणारा सूर राऊतांनी आळवला. 

कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाचा पराभव अटळ आहे असं सांगताना त्यांनी महाराष्ट्रात काही बड्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता या वस्तुस्थितीकडे सर्वांचं लक्ष वेधलं. 'हे जे बच्चम आहेत त्यांनी हिंमत असेल तर स्वत:ची उमेदवारी जाहीर करावी. महाराष्ट्रात सगळ्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्या फक्त तुमची आणि ठाण्यातली उमेदवारी आता बाकी आहे' अशा शब्दांत त्यांनी श्रीकांत शिंदे यांना दम भरला. आता राऊतांना शिंदे गटाकडून कोण उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. किंबहुना महायुतीतून कल्याण मतदारसंघातून आता नेमकी कोणाची उमेदवारी जाहीर होते यावर सर्वांचं लक्ष असेल.