'....तर मी टोकाचा विरोध करतो', राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देताना दिला इशारा, 'माझा राग...'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (Mahayuti) जाहीर पाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदींसाठी (Narendra Modi) आपण भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa Rally) मेळाव्यात स्पष्ट केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी एक इशाराही दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 9, 2024, 09:22 PM IST
'....तर मी टोकाचा विरोध करतो', राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देताना दिला इशारा, 'माझा राग...' title=

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (Mahayuti) जाहीर पाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदींसाठी (Narendra Modi) आपण भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa Rally) मेळाव्यात स्पष्ट केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी एक इशाराही दिला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींनी तरुणांकडे लक्ष दिलं पाहिजे. हेच भविष्य आहे असंही म्हटलं. 

"2014 च्या निवडणुकीनंतर मी जे ऐकत होतो ते 5 वर्षात दिसत नसल्याचं लक्षात आलं. जे मला पटणार नाही ते मी सांगतो. ज्या चांगल्या वाटल्या त्यांचं कौतुक करणार. राजीव गांधी यांच्यानंतर पहिल्यांदा 20 ते 30 वर्षांनी एका व्यक्तीच्या हातात सत्ता आली. आपण ज्यांच्याशी संबंध नसतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण ज्याच्यावर विश्वास आहे त्याला तडा जाऊ लागतो तेव्हा राग येतो. माझा राग तर टोकाचा आहे," असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे. 

MNS Gudi Padwa Melava: राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर

पुढे ते म्हणाले, "मी महाराष्ट्र, मराठी भाषा, लोकांवर टोकाचं प्रेम करतो. तसंच विश्वास टाकला तर टोकाचं प्रेम करतो. पण तसं दिसलं नाही तर टोकाचा विरोध करतो. लाव रे व्हिडीओमधून ही गोष्ट दिसली असेल. 370 कलम रद्द झाल्यानंतर सर्वात आधी मी अभिनंदन केलं. 5 वर्षात ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्यांचं कौतुक केलं होतं".

'अन्यथा देशात अराजकता निर्माण होईल'

"10 वर्षांनी आपला देश पुन्हा वयस्कर होईल. नरेंद्र मोदींनी तरुणांकडे लक्ष दिलं पाहिजे. हेच भविष्य आहे. प्रत्येक देशाचा एक काळ येतो. जसं जपानमध्ये एक काळ आला. तिथे अनेक कंपन्या उभ्या राहिल्या. व्यवसाय निर्माण झाले, आणि आज कुठे आहे पाहा. असाच आपला देश घुसळून निघाला पाहिजे. जर तसं घडलं नाही तर सर्वांचा विश्वास उडून जाईल. देशात फक्त अराजक निर्माण होईल. देशात 6 लाख उद्योगपती देश सोडून गेल्याचं लोकसभेत सांगण्यात आलं. हे आता होता कामा नये. महाराष्ट्र जो कर भरतो त्याचा मोठा वाटा मिळाला पाहिजे. यासाठी मोदींकडून अपेक्षा आहे," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

"उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांप्रमाणे टीका केली नाही"

"मी कधीही वैयक्तिक टीका करत नाही. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भाजपा आणि मोदींवर करत आहेत तशी मी करत नव्हतो. मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून विरोध केला नाही. तर भूमिका पटली नाही म्हणून विरोध केला. मी विरोधात बोलत असताना खिशातले राजीनामा काढून सोबत का आला नाहीत. तेव्हा सत्तेचा मलिदा चाटत होते. आज यांना या गोष्टी सुचत आहेत. पक्ष फुटला, सत्तेतून बाहरे काढलं म्हणून करत आहेत. मला काही हवं होतं म्हणून विरोध केला नाही", अशी टीकाही त्यांनी केली.