महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडी, पारा ८.४ अंशावर

 महाबळेश्वरचा पारा ८.४ अंशावर आला आहे. गुलाबी थंडीचा अनुभव इथले पर्यटक घेत आहेत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 20, 2017, 09:50 AM IST
 महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडी, पारा ८.४ अंशावर  title=

सातारा :  हवामानातील बदलामंळू तापमानात बदल होत आहे. थंडीने महाबळेश्वर गारठल्याचे दिसून येत आहे.

तापमान कमी होत महाबळेश्वरचा पारा ८.४ अंशावर आला आहे. गुलाबी थंडीचा अनुभव इथले पर्यटक घेत आहेत. 

महाबळेश्वरचा पारा इथून पुढे हळू कमी होत ४ अंशावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामूळे येणाऱ्या काळात पर्यटकांनी संख्याही वाढलेली दिसणार आहे.