मोठी बातमी । 'राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने...'

Maharashtra political crisis​ : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक ट्वीट केले आहे. या ट्विटची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  

Updated: Jun 22, 2022, 12:09 PM IST
मोठी बातमी । 'राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने...' title=

मुंबई : Maharashtra political crisis : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक ट्वीट केले आहे. या ट्विटची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. संजय राऊत यांचे विधानसभा बरखास्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे बंड महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

 संजय राऊत यांनी ट्वीटरवरून बरखास्तीचे संकेत देताना म्हटले आहे, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने आहे. 

महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. सुरु असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गुजरातमधील सूरत येथून आसाममधील गुवाहाटी येथे स्थलांतरित झाले आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 33 आमदार आणि 6 अपक्ष आमदारही गुवाहाटीला पोहोचले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला असून त्यात शिवसेनेचे 34 आणि 6 अपक्ष आमदार आहेत.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर भाजपही सतर्क झाले आहे. राज्यातील भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी तंबी दिली आहे. राज्यातील लोटस ऑपेरशन विषयी आणि राजकीय घडामोडींबाबत कोणतंही भाष्य करायचे नाही असं देवेंद्र फडणवीसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना सांगीतलंय. भाजपची अंतर्गत माहिती बाहेर जाता कामा नये असे आदेश फडणवीसांनी सर्वांना दिलेत.