Maharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Akola School Students Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 10 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय. 

नेहा चौधरी | Updated: Feb 28, 2024, 08:42 AM IST
Maharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा title=
Maharashtra News Remains of dead rat in school feeding canteen Food poisoning 10 students in Akola School

जयेश जगड, झी मीडियाा, अकोला : राज्यातील मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचं वाटप करण्यात येतं. मुलांना दुपारच्या जेवण्यात शाळेत खिचडी देण्यात येते. या शालेय पोषण आहाराबद्दल पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोल्या शहरातील मनपाच्या शाळेत शालेय पोषण आहारातील खिचडी खाल्ल्यानंतर 10 मुलांना विषबाधा झाली आहे. धक्कादायक म्हणजे या पोषण आहारातील खिचडीत मेलेल्या उंदराचं अवशेष सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Maharashtra News Remains of dead rat in school feeding canteen Food poisoning 10 students in Akola School )

अकोल्यातील शिवसेना वसाहतीतील 26 क्रमांकाच्या शाळेतील ही धक्कादायक घटना आहे. नेहमी प्रमाणे दुपारच्या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात खिचडी देण्यात आली. ती खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ व्हायला लागली. नेमकं झालं हे पाहण्यासाठी खिचडीची तपासणी करण्यात आली तेव्हा त्या खिचडीत मेलेल्या उंदाराचे अवशेष सापडल्याने खळबळ माजली. शाळा प्रशासन आणि शालेय पोषण आहारा वाटप करणाऱ्या सगळ्यांच्या हलगर्जीपणा मुलांशी जीवाशी आला.  

दरम्यान त्या विद्यार्थ्यांना त्वरित अकोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी करून ठेकेदारांला कडक शिक्षा करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येते आहे.  झालेला प्रकार अतिशय गंभीर आणि किळसवाणा असल्याने प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहावं लागणार आहे.