शिंदे-फडणवीस सरकार जोरात, पहिल्या 24 दिवसांतच काढले तब्बल 538 जीआर

Maharashtra Government GR : राज्यात नवनिर्वाचित शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नसला तरी प्रशासकीय पातळीवर राज्याचा कार्यभार जोरात सुरु आहे.  

Updated: Jul 26, 2022, 11:53 AM IST
शिंदे-फडणवीस सरकार जोरात, पहिल्या 24 दिवसांतच काढले तब्बल 538 जीआर  title=

मुंबई : Maharashtra Government GR : राज्यात नवनिर्वाचित शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नसला तरी प्रशासकीय पातळीवर राज्याचा कार्यभार जोरात सुरु आहे. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधीच्या पहिल्या 24 दिवसांतच तब्बल 538  जीआर काढण्यात आलेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने ते प्रशासकीय पातळीवरच काढले गेले. हा वेग पाहता दिवसाकाठी 22 तर कार्यालयीन वेळ गृहीत धरली तर प्रत्येक तासाला 2.5 जीआर निघालेत.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काही मंजूर कामांना स्थगिती देण्याचाही सपाटा लावला होता. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. त्यामुळे बेकायदेशीर जीआर काढण्यात आल्याचे सांगत शिंदे-फडणवीस सरकारने ते रद्द केलेत. शेवटच्या काही दिवसात सर्वाधिक जीआर काढल्याचा आरोप करण्यात आला.
 
शिंदे-फडणवीस सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सराकरपेक्षा 50 टक्के जास्त वेगाने हे जीआर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. सर्वाधिक जीआर हे सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, जलसंपदा विभाग, महसूल आणि वन विभाग आणि वैद्यकीय  शिक्षण विभागाचे आहेत. दरम्यान, संसदीय कार्य आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांची माहितीच उपलब्ध झालेली नाही.

काढण्यात आलेले जीआर

सर्वाधिक जीआर : पाच खाती
- सार्वजनिक आरोग्य 73
- पाणीपुरवठा व स्वच्छता 68
- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 43
- सामान्य प्रशासन विभाग 34
- जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग आणि वैद्यकीय  शिक्षण व औषधी द्रव्य (3) प्रत्येकी 24

ग्रामविकास विभाग : 22

-कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय : 22
-उच्च व तंत्रशिक्षण : 21
-गृह विभाग : 20
-आदिवासी विभाग : 19
-मृद व जलसंधारण : 17 -सामाजिक न्याय व विशेष साहाय्य : 14
-सहकार, पणन व वस्त्रोद्योग :13
-सार्वजनिक बांधकाम :13
-कौशल्य विकास व उद्योजकता : 12
-महिला व बालकल्याण विभाग : 10

सर्वात कमी जीआर 

- मराठी भाषा विभाग  1
- पर्यावरण विभाग  2
- अन्न व नागरी पुरवठा, इमाव कल्याण, गृहनिर्माण आणि पर्यटन व सांस्कृतिक (4) प्रत्येकी 5
- उद्योग, ऊर्जा आणि कामगार, नगरविकास विभाग, नियोजन विभाग व वित्त विभाग (4)-प्रत्येकी 9