'शेतकरी आत्महत्ये'चा देखावा तरूणाच्या जीवावर बेतला

वैकुंठ चतुर्दशीच्या शोभायात्रेमध्ये 'शेतकरी आत्महत्या' हा चित्ररथ दाखवणे एका तरूणाच्या जीवावर बेतला आहे.

Updated: Nov 5, 2017, 08:00 AM IST
'शेतकरी आत्महत्ये'चा देखावा तरूणाच्या जीवावर बेतला  title=

नागपूर  : वैकुंठ चतुर्दशीच्या शोभायात्रेमध्ये 'शेतकरी आत्महत्या' हा चित्ररथ दाखवणे एका तरूणाच्या जीवावर बेतला आहे.

मनोज धुर्वे या २७ वर्षीय तरूणाचा गळ्याला फास लागल्याने मृत्यू झाला आहे. 

नागपूरात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शोभायात्रेचे आयोजन केले जाते. यामध्ये धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांकडे लक्ष वेधून घेतले जाते. त्यानुसार मनोजने 'शेतकरी आत्महत्या'चा प्रश्न मांडला होता. याकरिता तो गळ्यात फास अडकवून ट्रॅक्टरवर होता. काही वेळाने ट्र्क्टर सुरू झाला. तेव्हा त्याचे हात-पाय लटपटले. पण हा प्रकार त्याच्या अभिनयाचा एक भाग असेल त्याच्या इतर साथीदारांना वाटले. काही वेळाने मनोज उठलाच नाही. तेव्हा या प्रकाराचे गांभीर्य इतरांच्या लक्षात आले. 

मनोजला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तेथेच मृत घोषित केले होते. सदर प्रकरणी पोलिसांनी  आयोजक आणि इतर अनेक लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.