पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या

जरीपटका येथील घटनेनं  हादरलं नागपूर 

Updated: Jan 18, 2022, 08:17 PM IST
पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या  title=

नागपूर- शहरातील जरीपटका येथील दयानंद पार्क परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळल्यानं आज एकच खळबळ उडाली.मदन अग्रवाल नावाच्या व्यक्तीनं गळफास लावून आत्महत्या केली.आत्महत्या करण्यापूर्वी
मदननं पत्नी किरण आणि दोन चिमुकल्या मुलांचा चाकूनं वार करून हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.ऋषभ आणि टीया असं मयत लहानग्यांचे नाव आहे 
             दयानंद पार्क परिसरात मदन अग्रवाल आपल्या कुटुंबासोबत एका खोलीत वास्तव्यास होता.त्याचा चायनीज खाद्यपदार्थांचा स्टॉल होता.आज दुपारी साडेतीनवाजता त्याचा मित्र त्याच्या घरी आल्यानंतर मदन त्याला 
गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. मित्रानं तातडीनं त्याच्या मदनच्या कुटुंबातील इतर सदस्य आणि पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस दयानंद पार्कमधील मदन अग्रवालच्या घरी पोहचल्यानंतर त्यांना मदनसह त्याची
पत्नी आणि त्यांच्या दहा मुलगा ऋषभ व चार वर्षाची चिमुकली टीया यांचे मृतदेह आढळले.मदन  गळफास लावून आत्महत्या केलेल्या अवस्थेत आणि पत्नी व दोन्ही मुलाचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आले. त्यामुळं मदन अग्रवालने पत्नी व 
ऋषभ व टीया या दोघा चिमुकल्यांची हत्या करून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.चायनीज खाद्यपदार्थांचा स्टॉल असलेला मदन कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल असल्याचा शक्यता आहे.जरीपटका पोलीस याप्रकरणी  तपास करताय.मदन इतका कर्जबाजारी कसा झाला याबाबतही पोलीस तपास करताय

रात्रीच हत्या करून आत्महत्या केल्याची शक्यता

दुपारी तीन वाजता मदनच्या घरी एक मित्र पोहचल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचं अगोदर समोर आलं.मात्र पोलीस पोहचल्यावर तिथे मदनची पत्नी आणि त्याच्या दोन चिमुकल्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आले.
मदनने रात्रीच पत्नी आणि मुलांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर त्यानं स्वत:ला संपवल्याचा अंदाज आहे. मदनला जुगार वा बेटिंगचं व्यसन होता का याबाबात पोलीस तपास करताय.
-----------