येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह राज्यातून मान्सून गेल्या काही दिवसांपासून गायब झाला होता. पण गेल्या २४ तासात पावसाने हजेरी लावली असून चांगलाच बरसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 20, 2017, 08:49 AM IST
येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा title=

मुंबई : मुंबईसह राज्यातून मान्सून गेल्या काही दिवसांपासून गायब झाला होता. पण गेल्या २४ तासात पावसाने हजेरी लावली असून चांगलाच बरसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

दरम्यान पुढील चोवीस तासांत विदर्भात काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

उत्तर व दक्षिण मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील ४८ तासांत मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 

हवामान खात्याने लावलेला अंदाज खरा ठरला असून शुक्रवार-शनिवारपासून राज्यात मान्सून सक्र‌िय झाला आहे. विदर्भासह इतर भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे.

कुठे कसा झाला पाऊस ?

 ब्रह्मपुरीमध्ये मागील चोवीस तासात ६९.६ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल महाबळेश्वर, अमरावती, गोंदियामध्ये पावसाची नोंद झाली आहे.त्या तुलनेत मुंबईत पाऊस अधूनमधून हजेरी लावत होता.

त्याखालोखाल महाबळेश्वर ४७. ६ मिमी, वर्धा ४३.२ मिमी, अमरावती ३८.३ मिमी, गोंदिया येथे ३७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोकणात वेंगुर्ला येथे २५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.