Pune Politics: ही दोस्ती तुटायची नाय! पुण्याच्या राजकारणाला नवं वळण, दोन मित्र पुन्हा आले एकत्र

Ajit pawar, Sanjay Kakade: संजय काकडे यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. भेट घेऊन त्यांनी नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

सौरभ तळेकर | Updated: Jul 12, 2023, 08:29 PM IST
Pune Politics: ही दोस्ती तुटायची नाय! पुण्याच्या राजकारणाला नवं वळण, दोन मित्र पुन्हा आले एकत्र title=
Ajit pawar, Sanjay Kakade

Maharastra Politics, Pune News: भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांची मैत्री सर्वश्रृत आहे. पहाटेच्या शपथविधीवेळी अजित संजय काकडे यांनी अजित पवारांना ज्याप्रकारे बॅकअप दिलं, त्यावरून त्यांच्या मैत्राचं नातं किती घट्ट आहे, याची प्रचिती मिळते. अशातच आता संजय काकडे पुन्हा अजितदादांसाठी अॅक्टिव झाल्याचं पहायला मिळतंय. संजय काकडे यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

संजय काकडे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. पुण्यातील दोन जुने राजकीय मित्र पुन्हा एकदा एकत्र दिसल्याने आता पुण्याच्या राजकारणावर त्याचा परिणाम दिसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुण्याच्या राजकारणात ते एकमेकांच्या विरोधात होते. मात्र, नव्या युतीमुळे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडीनंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघालंय. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याने आता कोण विरोधक आणि कोणता मित्रपक्ष? असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.

पुणे शहर आणि जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी हे प्रतिस्पर्धी होते, पण आता एकत्र आले असले तरी दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडून येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केली होती. त्यावर देखील संजय काकडे यांनी अजितदादांना रस्ता दाखवण्याचं काम केलं होतं.

आणखी वाचा - राज ठाकरे म्हणजे यारो का यार, आम्ही दोघं...; अतुल परचुरेंनी सांगितला शाळेतला 'तो' किस्सा!

अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाबाबतची महत्त्वाकांक्षा कोणापासूनही लपलेली नाही. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे अजित पवारांच्या भाजपच्या वरिष्ठांशी वाटाघाटी झाल्या असतील, तर ते मुख्यमंत्री होतील, असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला होता. आता अजित पवार आणि संजय काकडे यांची एकजूट पुण्याच्या राजकारणात कोणता धुरळा उडवणार?, हे येता काळच ठरवू शकेल.