Mahavitaran Strike : राज्यात संपाचा मोठा झटका; अनेक वीज प्रकल्प बंद, पाहा कुठे कसा झाला परिणाम?

Mahavitaran Strike : महावितरण कंपनीच्या (MSEB Employee Strike) खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. (Maharashtra News in Marathi) याचा मोठा परिणाम हा ग्रामीण भागात दिसून येत आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Jan 4, 2023, 01:50 PM IST
Mahavitaran Strike : राज्यात संपाचा मोठा झटका; अनेक वीज प्रकल्प बंद, पाहा कुठे कसा झाला परिणाम? title=

Mahavitaran Strike Latest News : महावितरण कंपनीच्या (MSEB Employee Strike) खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. (Maharashtra News in Marathi) याचा मोठा परिणाम हा ग्रामीण भागात दिसून येत आहे. अनेक ठिकाणांची बत्ती गुल झाली आहे. दरम्यान, वीज कर्मचारी संपावर (MSEB Strike)गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला असताना संप सुरुच आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी अधिक आक्रमक झाले आहेत. कोयना, चंद्रपूर औष्णिक वीज प्रकल्प आणि नागपूर येथील वीज प्रकल्पातील अनेक युनिट बंद आहे. त्यामुळे वीज निर्मितीवर मोठा परिणाम झालाय. राज्यात केवळ 6 हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. संप जर मिटला नाही तर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

 Mahavitaran Strike LIVE : संपकरी कर्मचाऱ्यांना अखेर मेस्मा लावला 

राज्यात केवळ 6 हजार मेगावॅट वीजनिर्मिती

महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यात केवळ 6 हजार मेगावॅट वीजनिर्मितीच सुरु आहे. या संपाचा सर्वाधिक फटका हा  ग्रामीण भागात बसला आहे. औद्योगिक वसाहतीतही काम बंद झाले आहे. दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा देण्याता आला आहे. तर दुसरीकडे संप आजच मिटेल, असा विश्वास महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केला आहे.

नागपुरात कर्मचारी आक्रमक, अदानी गो बॅक....च्या घोषणा

Nagpur Strike News: महावितरण कर्मचा-यांच्या संपामुळे राज्यातले अनेक वीज प्रकल्प बंद पडले आहेत. याचा ग्रामीण भागात मोठा फटका बसला आहे. औद्योगिक वसाहतीतही काम बंद पडले आहे. दरम्यान, राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपात नागपुरातील वीज कर्मचारी संविधान चौकात एकत्र येऊन सरकरविरोधात घोषणाबाजी केली. अदानी गो बॅक..... वीज उद्योगाचे खासगीकरण बंद करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये एकलहरा वीज निर्मिती केंद्रावर आंदोलन 

Nashik Strike News : नाशिकच्या एकलहरा वीज निर्मिती केंद्रावर आंदोलन सुरु आहे. अदानीविरोधात वीज कर्मचारी संपावर गेलेत. संपामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका नाशिकमध्येही बसताना दिसतोय. रात्रीपासून अनेक भागात बत्ती गुल झालीय. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

पुणेकरांना मोठा मनस्ताप, मोबाईल चार्ज होत नाही तर गिझर बंद 

Pune Strike News : वीज वितरण कर्मचारी संपाचा फटका पुण्यातल्या विविध भागांत बसलेला पाहायला मिळतोय. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये बत्ती गुल झालीय. धायरी, कात्रज, शिवणे, सन सिटी, वडगाव सिंहगड रोड परिसरात लाईट बंद झालीय.  रात्रीपासूनच वीजपुरवठा खंडीत असल्याचा फटका कामावर जाणाऱ्यांना बसला आहे. मोबाईल चार्ज होत नाहीएत, तर गिझर बंद असल्यानं गॅसवर पाणी तापवण्याची वेळ आलीय. बत्ती गुल असल्याचा मनस्ताप पुणेकरांना सहन करावा लागत आहे.

राज्यभर कर्मचारी आक्रमक, मध्य प्रदेश वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना विरोध

Washim, Yavatmal Strike News : नागपूर, वाशिम, यवतमाळमध्येही वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. नागपुरात मध्य प्रदेश वीज मंडळाचे कर्मचारी कोरडी पॉवर स्टेशनला दाखल होत असताना राज्य वीज कर्मचाऱ्यांनी त्यांना  जोरदार विरोध करताना घोषणाबाजी केली. वाशिम जिल्ह्यातील 600 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. रात्री पासून हा संप सुरू करण्यात आलाय. वाशिमच्या वीज कर्मचा-यांनी  महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करत खासगीकरणाचा विरोध केला. तर यवतमाळमध्ये महावितरण कर्मचा-यांच्या 72 तासांच्या संपाला सुरुवात झाली आहे. अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने विज वितरणासाठी परवानगी मागितल्यानं राज्यभर कर्मचारी आक्रमक झालेत. 

पारस महाऔष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी संपावर 

Akola Strike News : अकोला जिल्ह्यातील पारस महाऔष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी संपावर गेलेत. त्याचा फटका वीज निर्मितीला बसतोय. प्रकल्पातील 250 मेगावॅट क्षमतेचं एक युनिट बंद पडलंय. संपक-यांनी हे युनिट बंद पाडल्याचा दावा करत असले तरी काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे ते बंद असल्याचं प्रकल्प अधिका-यांनी सांगितलंय. या प्रकल्पात 500 मेगावॅट वीज निर्मिती होते. पारस महाऔष्णिक वीज केंद्रातील 560 पैकी 540 कर्मचारी संपात सामील झालेत

खापरखेडा पॅावर प्लांटमधील संच संपामुळे बंद

Khaparkheda Strike News : वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पॅावर प्लांट येथील तीन संच संपामुळे बंद आहेत. खापरखेडा पॅावर प्लांट येथील युनीट 2, 3 आणि 4 बंद असल्याने विद्युत पुरवठ्यावर याचा परिणाम झालाय.  खापरखेडा पॅावर प्लांट येथील 95 टक्के कर्मचारी संपावर आहेत. संपामुळे खापरखेडा पॅावर प्लांट येथील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

वैजापूर तालुक्यात काही भागात रात्रीपासून वीज गायब

Sambhajinagar Strike News : संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात काही भागात रात्रीपासून वीज नाहीए. तर गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वडगाव, लासुर स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरातही रात्रीपासून वीज गेली आहे.. संपामुळे कर्मचारी कामावर नाहीएत, त्यामुळे वीज पुरवठा पुर्ववत झालेला नाही. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर झाला आहे. 

भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून लाईट बंद 

Bhandara Strike News : भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून लाईट बंद आहे. लाईट नसल्यानं नागरिकांची सकाळची कामं खोळंबलीत..लाखांदूरमध्ये पहाटेपासून वीजपुरवठा खंडीत आहेत. अदानीविरोधात वीज कर्मचारी संपावर आहेत मात्र त्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागतोय. 

पनवेल येथील इंडिया बुल्स परिसरात वीज पुरवठा खंडीत

Panvel Strike News : नवी मुंबई जवळील पनवेल येथील इंडिया बुल्स परिसरात मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. इतर भागात वीज पुरवठा सुरळीत आहे. उरण शहर काही भागात पहाटे 5 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दरम्यान, नवी मुंबईमध्ये मात्र वीजपुरवठा सुरळीत आहे. तरऔद्योगिक वसाहतीमध्येही वीज पुरवठा सुरळीत आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात बत्ती गुल

Ratnagiri Strike News : वीज कर्मचारी संपावर गेल्याचा फटका राज्यातल्या ग्रामीण भागातही बसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात बत्ती गुल झाली आहे. रत्नागिरी शहर वगळता राजपूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यातील वीज गेली आहे. त्यामुळे अनेक व्यवसायावर याचा परिणाम दिसून येत आहे. 

कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला संपाचा फटका

Western Maharashtra Strike News : राज्यातील वीज कर्मचारी संपाचा कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांअभावी कोयना प्रकल्पातील 36 मेगावॅटचे एक युनिट बंद आहे. कोयना धरणाच्या पायथा वीज प्रकल्पातील 35 कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. पोफळी वीजनिर्मिती प्रकल्पातीलही कर्मचारी संपामुळे कामावर आलेले नाहीत. कर्मचारी संपामुळे कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीवर मोठा परिणाम होवू शकतो. 

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका

Chandrapur Strike News : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका बसला आहे. 210 मेगावॅट क्षमतेचं युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचं युनिट 5 पडले बंद, युनिट 4 मध्ये एअर हीटर ची समस्या उदभवली आहे तर युनिट 5 मध्ये कोळशाची राख बाहेर निघण्याच्या प्रक्रियेत बिघाड आल्याने दोन्ही युनिट कऱण्यात आले आहेत. चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील 2500 कर्मचारी संपात सहभागी झालेत. 

महावितरण कर्मचाऱ्यांना सरकारचा गंभीर इशारा 

Mahavitaran Strike News : वीज कर्मचारी संपावर गेल्याचा फटका राज्यातल्या ग्रामीण भागातही बसत आहे. साताऱ्याच्या ग्रामीण भागातही बत्ती गुल झाली आहे. आधीच ग्रामीण भागात लोडशेडिंगचं संकट असतं. त्यात आता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारीच उपलब्ध नाहीत. तसंच वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो पुर्ववत करणार नसल्याचं पत्रकही संपकरी वीज कर्मचा-यांनी काढलंय. तेव्हा ग्रामीण भागातला वीजपुरवठा कधी पुर्ववत होणार हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. 

खासगीकरणाला तीव्र विरोध, चर्चा फिस्कटल्याने 72 तासाचा संप अटळ

Mahavitaran Strike News : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या हालचालींविरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. अदानी कंपनीला वीज वितरण परवानगी मिळाली तर कर्मचारी आणि ग्राहकांना खर्चात लोटण्याचा प्रकार असेल त्यामुळे परवानगी देऊ नये, अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे. प्रधान ऊर्जा सचिव आणि तिन्ही कंपन्याचे अध्यक्ष तसेच संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा झाली. मात्र ती फिस्कटल्यामुळे 72 तासाचा संप अटळ आहे.

पुण्यात अनेक ठिकाणी बत्ती गुल

Pune Strike News : वीज वितरण कर्मचारी संपाचा फटका पुण्यातल्या विविध भागांत बसलेला पाहायला मिळतोय. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये बत्ती गुल झालीय. शिवणे, सन सिटी, वडगाव सिंहगड रोड परिसरात लाईट बंद झालीय. वीज वितरण कर्मचारी संपावर असल्याने रात्रीपासूनच लाईट बंद आहे. तर शहरातही अनेक ठिकाणी कर्मचारी संपावर असल्यानेही वीजपुरवठा खंडीत झालाय.

संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी बैठक

Mahavitaran Strike News : राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 1 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे. महावितरण संपकरी संघटना कर्मचारी तसsच महावितरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

वीज कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा, ... तर मेस्मा लावणार

 Mahavitaran Strike News : राज्यभरातील बत्ती आजपासून गुल होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारलाय. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिलाय. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलाय.