मुंबई-पुणे दरम्यान अपघाताचा थरार, व्हीडिओ पाहून सांगा चूक कुणाची?

राज्यातील परिवहन खात्याने जड वाहनांना लेनची शिस्त लावण्याच्या बाबतीत लाज सोडलीय.

Updated: Jul 2, 2021, 09:52 PM IST
मुंबई-पुणे दरम्यान अपघाताचा थरार, व्हीडिओ पाहून सांगा चूक कुणाची? title=

प्रफुल्ल पवार, झी २४ तास, रायगड  : राज्यातील परिवहन खात्याने जड वाहनांना लेनची शिस्त लावण्याच्या बाबतीत लाज सोडलीय. मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवरील अपघाताचा वास्तव दाखवणारा एक व्हीडिओ समोर आला आहे. या अपघातात एकाच कुटूंबातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कुठेही जड वाहनांना लेनमध्ये चालण्याची शिस्त दिसून येत नाहीय. या शिस्तीचे बळी ठरले आहेत, एकाच कुटूंबातील ३ जण.  तुम्ही या अपघाताचा व्हीडिओ पाहा आणि सांगा यात नेमकी चूक कुणाची आहे. खोपोलीजवळ बोरघाटात हा अपघात झाला.

राज्यात कोणत्याही हायवेवर जड वाहन लेनची शिस्त पाळत नाहीत, या दरम्यानची जबाबदारी असणारे अधिकारी रस्त्यावर पाळत ठेवताना कधीही दिसत नाही. परराज्यातील ड्रायव्हर याचा सर्रास फायदा घेताना दिसतात आणि राज्याला माणसांच्या जीवाचे बळी द्यावे लागत आहेत.

परिवहन खात्यातील बहुतांश अधिकाऱ्यांना याचं कोणतंही सोयरं सुतक राहिलेलं नाही. जड वाहनांनी कशीही आणि कितीही टन वजनाची वाहतूक केली, लहान गाड्यांच्या लेनमधून वेगात गाडी हाकली याची कोणतीही बाब या अधिकाऱ्यांच्या मनाला टोचत नाही. 

यामुळे जड वाहनांवर परिवहनातील बहुतेक अधिकाऱ्यांच्या दांड्या मार, घरी झोपा काढ अशा बेशिस्तीने जड वाहन चालकांचं अधिक फावतंय. फक्त सर्वसामान्यांना जीवाच्या रुपात किंमत मोजावी लागत आहे.