मुंबई-पुणे अंतर २० मिनिटात कसं कापणार?

साधारणत: मुंबई पुण्यासाठी २० मिनिटे लागतील, आणि यासाठी अंदाजे भाडे असणार आहे १२०० रूपये.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 17, 2017, 11:48 AM IST
मुंबई-पुणे अंतर २० मिनिटात कसं कापणार? title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुणे - मुंबई दरम्यान हायपर लूप करता येईल का? त्यात काय अडचणी येऊ शकतात? प्रकल्पाचा खर्च किती असेल आणि प्रवाशांची संख्या किती असेल. याचा अहवाल पुढल्या सहा आठवड्यांत हायपर लूप वन ही कंपनी आणि पीएमआरडीए एकत्रितपणे तयार करणार आहेत. 

साधारणत: मुंबई पुण्यासाठी २० मिनिटे

हायपर लूपमध्ये व्हॅक्यूम ट्यूब तंत्रज्ञान वापरतात, यामुळे वेगाने ही वाहतूक शक्य आहे, साधारणत: मुंबई पुण्यासाठी २० मिनिटे लागतील, आणि यासाठी अंदाजे भाडे असणार आहे १२०० रूपये.

तासाला ५ हजार प्रवासी, १२०० भाडे

एवढंच नाही हे तंत्रज्ञान राबवण्याआधी या मार्गावर, तासाला ५ हजार प्रवासी संख्या असणे देखील आवश्यक आहे. हायपर लूप ही मेट्रोप्रमाणे कॉलमवर उभारली जाते.
सध्या आखाती देशात दुबई-दोहा दरम्यान हायपर लूपचं काम सुरू आहे. हायपर लूप राबवणारी कंपनी ही अमेरिकन आहे.

देशात ३ ठिकाणी हायपर लूप विचाराधीन

मुंबई ते पुणे, बंगळुरू ते चेन्नई आणि आंध्रप्रदेशमध्ये अंबरावती ते विजयवाडा या तीन ठिकाणी हायपर लूप विचाराधीन होतं, मात्र बंगळुरू ते चेन्नई अंतर जास्त असल्याने ते तेथे होणे शक्य नाही. आंध्रप्रदेशमध्ये अंबरावती ते विजयवाडा दरम्यान ही प्रवासी संख्या तासाला ५ हजार नसल्याने तेथेही होणे शक्य नाही.

अंतर कमी आणि सरळ रेषेत असावं

हायपरलूपचं आणखी एक महत्वाची आणि आवश्यक बाब म्हणजे हे अंतर सरळ रेषेत असावं लागतं. मुंबई आणि पुणे दरम्यान अंतर कमी आहे, सरळ रेषेत हायपरलूपचं काम होणार आहे का हे देखील पाहता येईल, याचा अहवाल ६ आठवड्यात येणार आहे.

जगात अजून हायपर लूप कुठेही नाही

हायपर लूपविषयी दुसरी महत्वाची बाब म्हणजे, जगात अशा प्रकारची सेवा अजून कुठेही अस्तित्वात आलेली नाही. आखाती देशात दुबई ते दोहा दरम्यान हायपर लूपचं काम सुरू आहे. एकविसाच्या शतकाच्या दृष्टीकोनातून या स्मार्ट वाहतुकीकडे पाहिले जात आहे.