कारच्या काचा फोडून आतल्या वस्तूंची चोरी करणाऱ्यांना नागपूर पोलिसांनी केली अटक

रस्तावर पार्क करण्यात आलेल्या कारच्या काचा फोडून आतमधील मौल्यवान वस्तू,सामान लंपास करणा-या टोळीला नागपुरच्या सीताबर्डी पोलिसांनी गजाआड केले आहे. 

Updated: Jan 11, 2018, 10:14 PM IST
कारच्या काचा फोडून आतल्या वस्तूंची चोरी करणाऱ्यांना नागपूर पोलिसांनी केली अटक title=

नागपूर : रस्तावर पार्क करण्यात आलेल्या कारच्या काचा फोडून आतमधील मौल्यवान वस्तू,सामान लंपास करणा-या टोळीला नागपुरच्या सीताबर्डी पोलिसांनी गजाआड केले आहे.

पार्क कारच्या शेजारी ऑटो उभा करून त्याच्या आड कारच्या काचा फोडून हे टोळके चोरी करायचे. जितेंद्र रामटेके, मोहम्मद युनूस  आणि गंगाप्रसाद वर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

या टोळीचा म्होरक्या जितेंद्र रामटेके ऑटोचालक होता. तिघांच्या या टोळीने १० गुन्ह्यांची कुबली दिली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. टोळक्याकडून चोरीचे अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.