नमो महारोजगार मेळाव्यात 10 हजारहून अधिक नोकऱ्या, बेरोजगारांनी 'येथे' करा नोंदणी

Namo Maharojgar Melava: नमो महारोजगार मेळाव्याअंतर्गत दहा हजारहून अधिक जागा भरल्या जातील. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 2, 2023, 06:27 PM IST
नमो महारोजगार मेळाव्यात 10 हजारहून अधिक नोकऱ्या, बेरोजगारांनी 'येथे' करा नोंदणी  title=

Namo Maharojgar Melava: राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 10 हजारहून अधिक पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी एकूण रिक्त जागा, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

नमो महारोजगार मेळाव्याअंतर्गत दहा हजारहून अधिक जागा भरल्या जातील. यात फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदे भरली जाणार आहे. 

यासाठी दहावी, बारावी, आयटीआय, डी फार्म, एमबीए, पदवीधर, डिप्लोमाधारक, पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. 9 आणि 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत मेळावा होणार आहे.  जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, नागपूर विद्यापीठ, अमरावती रोड, नागपूर येथे हा मेळावा होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी देण्यात येणार आहे.

IDBI बँकेत बंपर भरती

बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. आयडीबीआय बॅंकेत बंपर भरती सुरु असून अधिकृत वेबसाइटवर यासाठी नोटिफिरकेशन जाहीर करण्यात आले आहे. आयडीबीआय बॅंकेत तब्बल 2100 रिक्त पदे भरली जाणार आहेत.  याअंतर्गत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) च्या 800 जागा भरल्या जातील. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांना यामध्ये 55 टक्के गुण अशी सवलत देण्यात येणार आहे. एक्झिक्युटिव्ह- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) च्या एकूण  1300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.  उमेदवारांना संपूर्ण भारतातील आयडीबीआय बॅंचमध्ये नोकरी करता येणार आहे. यासाठी 30 आणि 31 डिसेंबर 2023 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षा, मुलाखत, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 
6 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा