रूग्णालयातील व्हेंटिलेटरमध्ये सापडलं झुरळ; महिलेचा मृत्यू

या निमित्ताने वैद्यकिय महाविद्यालयात मोफत आणि माफक दरातल्या दर्जाहीन सुविधा चव्हाट्यावर आल्या आहेत.

Updated: Apr 24, 2018, 04:24 PM IST
रूग्णालयातील व्हेंटिलेटरमध्ये सापडलं झुरळ;  महिलेचा मृत्यू title=

नाशिक : वैद्यकीय क्षेत्रात किती अनागोंदी प्रकार सुरू आहेत याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.  नाशिकमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयातल्या व्हेंटिलेटरमध्ये चक्क झुरळ सापडलं आहे.  वेटिंलेटरमध्ये झुरळ आढळल्याच्या या धक्कादायक प्रकाराचा व्हीडीओही समोर आला आहे. विषबाधा झालेल्या एका महिलेला रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचारादरम्यान या महिलेचा रूग्णालयात मृत्यू झाला. याच व्हेंटिलेटरमध्ये झुरळ आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या निमित्ताने वैद्यकिय महाविद्यालयात मोफत आणि माफक दरातल्या दर्जाहीन सुविधा चव्हाट्यावर आल्या आहेत.  

काय आहे प्रकार?

विषबाधा झालेल्या एका महिलेला नाशिक येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. पण, दाखल करण्यात आलेल्या महिलेच्या वेटिंलेटरमध्येच हे झुरळ आढळले. या प्रकारानंतर हॉस्पीटलच्या गलथानपणामुळेच पेशंटच्या मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, अद्याप याबाबतीत तक्रार झली नसली तरी अंत्यसंस्कार झल्यानंतर याबाबत तकरार दाखल करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आयुक्तांनी बजावली होती ३५० रूग्णालयांना नोटीस

दरम्यान, पालिका आयुक्त तुकारम मुंढे यांनी नुकतेच गलथान व नियमबाह्य कारभार असलेल्या साडे तीनशे हॉस्पिटल्सला नोटीस देऊन अनेक हॉस्पीटल्स बंद करण्याचा ईशारा दिला होता. आता यातील सत्तर रुगांलायांनी विहित नियम पूर्ण करणे शक्य नसल्याने हॉस्पिटल्स बंद केली आहेत तर इतर रुगानालाये याबाबतीत पूर्तता करीत आहेत. या सर्वांना मुदत वाढवून देण्यात  आली असली तरी खाजगी हॉस्पिटल्सचा आणि महाविद्यालयांचा कारभार या निमिताने समोर आला आहे.