नवी मुंबई मनपाच्या साफसफाई कंत्राटामध्ये घोटाळा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात साफसफाई कंत्राटामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.

Updated: Jan 14, 2018, 11:30 PM IST
नवी मुंबई मनपाच्या साफसफाई कंत्राटामध्ये घोटाळा title=

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात साफसफाई कंत्राटामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.

माहितीच्या अधिकारात हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. ८ हजार ७९ लिटर केमिकलचा पुरवठा करून बिल मात्र, ३९ हजार लिटरचे घेतले आहेत. 

नवी मुंबई महापालिकेच्या पाच रुग्णालयातील  साफसफाईचा ठेका bvg इंडिया लिमिटेड या कंपनीने २०१४ ते २०१९ या पाच वर्षांसाठी घेतला आहे. हा सर्व ठेका ८० कोटी रुपयांचा असल्याने महापालिकेला प्रत्येक वर्षी १५ कोटी रुपये कंपनीला द्यावे लागतात. 

या ठेक्यानुसार bvg ने वाशी रुग्णालयाच्या साफसफाईसाठी महिन्याला तीन हजार ५७ लिटर केमिकल पुरविणे आवश्यक होते. मात्र, कंपनीने जून २०२६ ते २०१७ या कालावधीत या रुग्णालयात प्रत्येक महिन्याला सरासरी ६७३ लिटर केमिकलचा पुरवठा केला.

हा घोटाळा तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम, डॉ. दीपक परोपकारी, लेखाधिकारी धनराज गरड, सुहास शिंदे यांच्यामुळे हा घोटाळा झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते संजय सुर्वे यांनी केलाय. 

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी bvg चे कंत्राट  थांबविले होते. विद्यमान आयुक्त रामस्वामी यांनी मात्र  ते सुरु ठेवले.

नवी मुंबई | मनपाच्या साफसफाई कंत्राटामध्ये घोटाळा