आधी 'मातोश्री'वर हजेरी, आता शिवसेनेचे दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना

Rebel Sena Leader Eknath Shinde Update : एकनाथ शिंदे यांचे बंड थंड होण्याचे नाव घेत नाही. आज त्यात आणखी भर पडत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत. 

Updated: Jun 22, 2022, 11:56 AM IST
आधी 'मातोश्री'वर हजेरी, आता शिवसेनेचे दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना title=

मुंबई : Maharashtra political crisis : एकनाथ शिंदे यांचे बंड थंड होण्याचे नाव घेत नाही. (Rebel Sena Leader Eknath Shinde Update) आज त्यात आणखी भर पडत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत. यापैकी काल 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीला आमदार योगेश कदम उपस्थित होते. ते आज गुवाहाटीत दाखल झाल्याची माहिती आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश आहे. तसेच दुसरे आमदार संजय राठोड गुवाहाटीकडे रवाना झालेत. दरम्यान, आमदार योगेश कदम यांची शिवसेनेवर नाराजी होती.

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि अन्य नेते मंडळींनी खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम यांना डावलण्याचा प्रयत्न केला होता. तसा त्यांनी आरोपही केला होता. दापोली, मंडणगडच्या निवडणुकीतही त्यांना बाजुला ठेवले होते. त्यामुळे शिंदे यांच्या बंड नाट्यात योगेश कदमांचे नाव आहे का याची माहिती मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते घेत होते. मात्र, योगेश कदम हे मुंबईतच होते. आता ते गुवाहटीकडे रवाना झालेत. 

दरम्यान, आज सकाळी 9.45 वाजता शिंदेंसह बंडखोरांची बैठक होणार आहे. बैठकीत एकनाथ शिंदे पुढील रणनीती ठरवणार आहेत. एकनाथ शिंदे आजच राज्यपालांना पत्र देणार, अशी माहिती आहे. आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा, एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे राजात पुढे काय चित्र असेल याची उत्सुकता आहे.