Police Promotion : 20 पोलिस अधिकाऱ्यांचे प्रमोशन; रश्मी शुक्ला पुन्हा महत्वाच्या पदावर येणार

राज्यातील सत्तांतरानंतर रश्मी शुक्ला पुन्हा महत्वाच्या पदावर येणार आहेत. 20 पोलिस अधिकाऱ्यांचे प्रमोशन (Police Officer Promotion) झाले आहे. रश्मी शुक्ला यांचे नाव देखील प्रमोशन मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत आहे.

Updated: Feb 12, 2023, 03:44 PM IST
Police Promotion : 20 पोलिस अधिकाऱ्यांचे प्रमोशन; रश्मी शुक्ला पुन्हा महत्वाच्या पदावर येणार title=

Police Officer Promotion : महाविकास आघाडी सरकारच्या काळात समोर आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात कथित सुत्रधार IPS अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla Phone tapping Case ) यांना शिंदे-फडणवीस सरकारने क्लिनचीट दिली. राज्यातील सत्तांतरानंतर रश्मी शुक्ला पुन्हा महत्वाच्या पदावर येणार आहेत. 20 पोलिस अधिकाऱ्यांचे प्रमोशन (Police Officer Promotion) झाले आहे. रश्मी शुक्ला यांचे नाव देखील प्रमोशन मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत आहे. 

भारतीय पोलिस प्रशासन सेवेतील 20  अधिका-यांना पदोन्नती देण्यात आलीय. यात रश्मी शुक्ला, अतुलचंद्र कुलकर्णी, संदानंद दाते यांचा समावेश आहे. आता या अधिका-यांना पोलिस महासंचालकाचा दर्जा असणार आहे.  फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांचे नाव चांगलंच गाजलं. राज्यातील सत्तांतरानंतर शुक्ला पुन्हा महत्वाच्या पदावर येणार अशी चर्चा सुरू होती. अशातच रश्मी शुक्लांना बढती मिळाल्याची बातमी समोर आली.

सत्तातरानंतर फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांना क्लिनचीट मिळाली 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे आणि माजी आमदार आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारने शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.  फोन टॅपिंग प्रकरणात कथित सुत्रधार IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना शिंदे-फडणवीस सरकारने क्लिनचीट दिली आहे. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचाअहवाल (क्लोजर रिपोर्ट) पुणे कोर्टात सादर करण्यात आला. यामुळे प्रकरणाची फाईलच बंद झाली आहे. 

काय आहे फोन टॅपिंग प्रकरण

2019 साली विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेवेळी महाराष्ट्रात ऐतिहासिक सत्ता नाट्य पहायला मिळाले. शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली होती. हे सत्तानाट्य जवळपास 36 दिवस चाललं होतं. या काळात महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा करण्याता आला होता. यी  कथित फोन टॅपिंग प्रकरणात  सुत्रधार IPS अधिकारी रश्मी शुक्ला असल्याचा आरोप करण्यात आला होता. या  प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर या प्रकरणाचा तपास मुंबई सेलकडे सोपवण्यात आला होता.  शुक्ला यांना अटक होणार असल्याची चर्चा देखील रंगली होती.