Pune Crime News : पुण्यात दोन महिलांची तुंबळ हाणामारी, वडापाव तळण्याची कढई डोक्यात घातली अन्...

Womens Fight In Sadashiv Peth : हत्ती गणपती चौकात दुपारी साडेचार वाजता महिला आपला स्टॉल लावण्यासाठी आल्या. त्यावेळी आधीपासून स्टॉल लावत असलेली महिला अन् नवीन स्टॉल लावणाऱ्या महिलेमध्ये बाचाबाची झाली. 

Updated: Sep 20, 2023, 05:44 PM IST
Pune Crime News : पुण्यात दोन महिलांची तुंबळ हाणामारी, वडापाव तळण्याची कढई डोक्यात घातली अन्...  title=

Pune Crime News In Sadashiv Peth : पुणे शहरातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले गुन्हेगारी आता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. पुण्यात कोयता गँगची वाढणारी दहशत पुणे पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. अशातच आता पोलिसांनी देखील योग्य ती पाऊलं उचलल्याचं दिसून येतंय. अशातच आता पुण्यातील सदाशिव पेठेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हातगाडी लावण्यावरुन चांगलाच वाद पेटला अन् महिलेला मारहाण करून तिच्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता पुणे शहरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. त्यानंतर पुण्यात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये.

नेमकं काय झालं?

हत्ती गणपती चौकातील ज्ञान प्रबोधिनीच्या बाजूला अनेकदा वडापावचा लावलेला दिसतो. काही महिला या भागात वडापावचा गाडा चालवतात. हत्ती गणपती चौकात दुपारी साडेचार वाजता महिला आपला स्टॉल लावण्यासाठी आल्या. त्यावेळी आधीपासून स्टॉल लावत असलेली महिला अन् नवीन स्टॉल लावणाऱ्या महिलेमध्ये बाचाबाची झाली. गणेशचतुर्थीच्या दिवशी हा प्रकार घडल्याने लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद टोकाला गेला. त्यानंतर दोन्ही महिलांनी एकमेकींना शिवीगाळ केली. तर तक्रारदार महिला आणि तिच्या पतीला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय.

तक्रारदार महिलेच्या पतीच्या डोक्यात पाठीमागून येऊन वडा पाव तळण्याची कढई मारली. त्यानंतर तो जखमी झाला. महिलेच्या पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आता पोलिसांनी तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. दुपारी साडे चार वाजता हा प्रकार घडल्याने काही वेळ परिसरात खळबळ उडाली होती.

आणखी वाचा - Pune Ganpati News : पुण्यात पाचही मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा संपन्न; पाहा झलक

दरम्यान, पुण्यात विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालीये. त्यानुसार सिद्धार्थ साळुंखे, संग्राम साळुंखे, उत्तरा साळुंखे (रा. सदाशिव पेठ) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. झालेल्या या घटनेमुळे आता सदाशिव पेठेत नक्की चाललंय काय? असा सवाल विचारला जात आहे.