Pune Ganpati News : पुण्यात पाचही मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा संपन्न; पाहा झलक

Pune Ganpati utsav 2023 : पुण्यात पाचही मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा संपन्न; पाहा झलक  

Sep 19, 2023, 20:41 PM IST

Pune Ganpati utsav : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत झालं. दहा दिवसांच्या या मंगलमय उत्सवासाठी पुण्यनगरी सज्ज झालीय.

1/6

मानाचे पाच गणपती

पुण्यातील मानाच्या पाच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे आता पुणेकरांमध्ये आता उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे.

2/6

कसबा गणपती

पुण्यातील ग्रामदैवत असणारा आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी आठ वाजता उत्सव मंडपातून निघेल आणि सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी डॉक्टर आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली

3/6

तांबडी जोगेश्वरी

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी बाप्पाची मिरवणूक सकाळी साडेनऊ वाजता बँड आणि ढोल ताशाच्या गजरात निघेल आणि सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी श्री भूषण महारुद्र स्वामी महाराजांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली.

4/6

गुरुजी तालीम

मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाचं आगमन वाजत गाजत एका आकर्षक रथातून होईल तसेच दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली.

5/6

तुळशीबाग

मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपती उत्सव मंडळ ट्रस्टच्या वतीने प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीतून बाप्पाची मिरवणूक निघेल आणि सकाळी साडेबारा वाजता गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाली.

6/6

केसरीवाडा

टिळक पंचांगानुसार मानाच्या पाचव्या गणपतीची म्हणजेच केसरीवाड्याची प्राणप्रतिष्ठा 20 ऑगस्ट रोजी करण्यात आली असून आज बाप्पासमोर सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन केले आहे.