पुण्यात सिंहगड रोड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

 हे चोर चेहऱ्यावर रुमाल गुंडाळून सॅन्ट्रो कारमधून आले होते. 

Updated: Sep 28, 2017, 01:47 PM IST
पुण्यात सिंहगड रोड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ title=

पुणे : सिंहगड रोड परिसरात चोरट्यांनी धुमाकुळ घातलाय. परिसरात एकाच रात्री ५ ते ६ घरफोड्या झाल्या आहेत. मोहिते रेसडेन्सी, विशाल पार्क सोसायट्यांमधील बंद असलेले फ्लॅट्स चोरट्यांनी फोडले आहेत. हे चोर चेहऱ्यावर रुमाल गुंडाळून सॅन्ट्रो कारमधून आले होते. 

आल्या आल्या त्यांनी इमारतीमंधील सीसीटिव्हीच्या वायर्स तोडल्या. त्यानंतर कटरच्या साहाय्यानं फ्लॅट्सची कडी कोयंडे उचकटले. या घरफोड्यांमध्ये नेमका किती मुद्देमाल चोरीला गेलाय ते अजून समोर आलेलं नाही. दरम्यान या परिसरातील वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी निवेदन दिले होते.