मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली

मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळलीय

Updated: Jul 5, 2018, 08:11 AM IST

मुंबई :  मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळलीय. पहाटे साडेपाचच्या सुमारास महाड जवळच्या केंबुर्ली गावलगत मातीचा ढिगारा रस्त्यावर आलाय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प आहे. मुंबई-गोवा महार्मागाच्या चौपदरीकरणाचं काम सुरू असल्यानं या भागात आधीच वाहतूक धिम्या गतीनं होते. त्यातच मुसळधार पावसानं मातीचे लोट रस्त्यावर आले आहेत. हा ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू झालंय. ते पूर्ण होईपर्यंत वाहतूक ठप्पच रहाणार आहे. काम पूर्ण होण्यास अजून किमान तासाभराचा अवधी लागणार आहे.