Vedio : आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानाने रेल्वे प्रवाशाला जीवदान

रेल्वे स्टेशनवर आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानाने एका प्रवाशाला जीवदान मिळाले आहे. धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात वृद्ध प्रवासी प्लॅटफॉर्म व रेल्वेगाडीममधील फटीत ओढला गेला होता. मात्र तिथे गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानाने तत्परतेने त्या वयोवृद्ध प्रवाशाला बाहेर ओढत त्यांचा जीव वाचवला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 1, 2018, 10:33 PM IST
Vedio : आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानाने रेल्वे प्रवाशाला जीवदान title=

नागपूर : रेल्वे स्टेशनवर आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानाने एका प्रवाशाला जीवदान मिळाले आहे. धावत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात वृद्ध प्रवासी प्लॅटफॉर्म व रेल्वेगाडीममधील फटीत ओढला गेला होता. मात्र तिथे गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानाने तत्परतेने त्या वयोवृद्ध प्रवाशाला बाहेर ओढत त्यांचा जीव वाचवला. 

संध्याकाळी थरारक घटना

प्लॅटफार्म क्रमांक दोनवर मंगळवारी संध्याकाळी ही थरारक घटना घडली. के. पाराशर असं प्रवाशाचं नाव आहे. तर नागेश धनवटे असं आरपीएफ जवानाचं नाव आहे. के. पाराशर दक्षिण एक्स्प्रेसने हैदराबादला जाणार होते. त्यासाठी मंगळवारी संध्याकाळी ते या गाडीच्या प्रतिक्षेत होते. दरम्यान दक्षिण एक्स्प्रेसच्या वेळेवर दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म दोनवर येवून पोहोचली. पराशर चुकीने त्या गाडीत चढले. 

चुकीच्या गाडीत चढल्याने...

गाडीत चढल्यानंतर आपण चुकीच्या गाडीत चढल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान गाडी प्लॅटफॉर्मवरून निघाली होती गाडीने वेग धरला होता. गाडीतून खाली उतरताना पाराशर यांचा अंदाज चुकला आणि ते प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या गॅपमध्ये गेले. पण त्याचवेळी ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवान धनवटे यांनी त्यांचे प्राण वाचवले.