Buldhana Bus Accident : बुलडाणा बस अपघाताचा नवा व्हिडिओ आला समोर, बसचा कोळसा

Samruddhi Mahamarg  Buldhana Bus Accident  :  समृद्धी महामार्गावर सिंदखेड येथे अपघातानंतर एका खासगी बसला आग लागली. बसमधील प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर बसचा कोळसा झाला आहे. मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.  

Updated: Jul 1, 2023, 09:01 AM IST
Buldhana Bus Accident : बुलडाणा बस अपघाताचा नवा व्हिडिओ आला समोर, बसचा कोळसा  title=
Buldhana Bus Accident

Samruddhi Mahamarg  Buldhana Bus Accident  : समृद्धी महामार्गावर बुलडाणा येथील सिंदखेड येथे अपघातानंतर एका खासगी बसला आग लागली. बसमधील अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर बसचा कोळसा झाला आहे. मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते. 5 जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असताना काहींचे निधन झाले. बुलडाणा येथील समृद्धी महामार्ग एक्स्प्रेस वेवर ही मोठी दुर्घटना घडली. बसला आग लागल्याने बाहेर पडता न आल्याने लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. 

दरम्यान, नागपूरहून (Nagpur) पुण्याला (Pune) जाणाऱ्या विदर्भ बसला भीषण अपघात (Accident News) झाला. या भयानक अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव खासगी बस एका खांबाला धडकल्यामुळे ती संरक्षक कठड्यावर जाऊन आदळली. त्यानंतर ती पलटी झाली आणि तिने पेट घेतला. यात बसमधील प्रवाशांचा होरळून मृत्यू झाला.

बसमधील 25 जणांचा मृत्यू झाला

बुलडाणा येथील समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर 30 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागल्याने 25 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. काल रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेच्या वेळी बसमध्ये 30 प्रवासी होते, त्यापैकी 25 जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले होते. टायर फुटल्याने बस पलटली, त्यानंतर बसने पेट घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले. अपघाताचे कारण रस्त्यात अडथळा असल्याचे सांगितले जात आहे.

प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर 

या घटनेत प्रशासनाचा निष्काळजीपणाही समोर आल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर लगेचच लक्झरी बसने पेट घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दीड तास बस जळत राहिली, मात्र अग्निशमन विभाग आणि पोलिसांचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले नाही. त्यामुळे बसमधील लोकांचा होरपळून मृत्यू झाला.