दुकान पाट्यांची तोडफोड मनसेच्या ७ कार्यकर्त्यांना अटक

गुजराती दुकान पाटयांची तोडफोड केल्या प्रकरणी मनसेच्या सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. ही अटक  वसईच्या वालिव पोलिसांनी केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 20, 2018, 09:34 PM IST
दुकान पाट्यांची तोडफोड मनसेच्या ७ कार्यकर्त्यांना अटक title=

पालघर : गुजराती दुकान पाटयांची तोडफोड केल्या प्रकरणी मनसेच्या सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. ही अटक  वसईच्या वालिव पोलिसांनी केली आहे.

न्यायालयात करणार हजर

अटक करणाऱ्यात आलेल्या मनसेच्या या कार्यकर्त्यांना उदया करणार वसई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अटक केलेले सर्व मनसेचे पालघरचे कार्यकर्ते आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर वसईतील गुजराती फलक असलेल्या दुकानाचे फलक तोडले होते. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी रात्री शिवतीर्थावर सभा झाली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदींना केवळ गुजरातचीच काळजी असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर सभेनंतर घरी परतणाऱ्या संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती पाट्यांची तोडफोड केली.

मोदींवर राज ठाकरेंचा हल्लाबोल

भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अश्वासनांवर विश्वास ठेऊन लोकांनी यांना मतं दिली. यांनी भारताला काँग्रेसमुक्त करण्याचे अावाहन केले. लोकांनीही यांच्यावर विश्वास ठेवला. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची धोरणे पाहता आता मोदीमुक्त भारताची गरज निर्माण झाली आहे. हे दिसतं तितकं साध सोप प्रकरण नाही, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी यावेळी केला होता.

गुजराती पाट्यांची तोडफोड 

अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल्सवर गुजराती फलक लावण्यात आले होते. राज ठाकरे यांच्या सभेनंतर पालघरमधील आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी  या हॉटेल्सवर निशाणा साधला. हॉटेलच्या पाट्यांची तोडफोड केली. यामुळे पुन्हा एकदा मनसे मराठी मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे दिसून आले.

मनसेचा राग

मुंबई-अहमदाबाद हायवेवरील घोडबंदर ते तलासरी दरम्यानच्या बहुतांश धाबे, दुकाने, हॉटेलांवर आता गुजराती पाट्या झळकू लागल्या आहेत. वसई गुजरातला जोडण्यासाठी गुजराती व्यावसायिक प्रयत्न करत असल्याचेही निदर्शनास आलं होते.दरम्यान यांच्या दुकानांच्या पाट्यांवरून मराठीला तडीपार करुन गुजराती फलक झळकविण्यात येत होते. या सर्वांचा राग मनसे कार्यकर्त्यांनी काल काढल्याचे दिसून आले.