राजकीय भूमिका ठरलेली, ते कार्यकर्त्यांना कळते-शरद पवार

विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात केलंय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 11, 2018, 06:39 PM IST
राजकीय भूमिका ठरलेली, ते कार्यकर्त्यांना कळते-शरद पवार title=

कोल्हापूर : आपली राजकीय भूमिका स्वच्छ असून राजकीय लाईन ठरलेली, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात केलंय. 

माझ्या मनात काय आहे, हे माझ्या पक्षातल्या लोकांना कळतं असंही पवार म्हणालेत. यावेळी विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा उल्लेख केला.

बाळासाहेबांसोबतच्या मैत्रीचा आवर्जुन उल्लेख

विशेषतः दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच्या मैत्रीचा त्यांनी आर्वजून उल्लेख केला. महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी एकत्र यायचं असेल तसंच पाठिंबा द्यायचा असेल तर त्याबाबत सकारात्मक असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.