गौरी लंकेश हत्येप्रकरणी SIT पथक महाराष्ट्र आणि गोव्यात

पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी आता कर्नाटक SITची तीन पथक तपासासाठी गोवा आणि महाराष्ट्राकडे रवाना झाली आहेत.

Updated: Sep 13, 2017, 07:32 PM IST
गौरी लंकेश हत्येप्रकरणी SIT पथक महाराष्ट्र आणि गोव्यात

कोल्हापूर : पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी आता कर्नाटक SITची तीन पथक तपासासाठी गोवा आणि महाराष्ट्राकडे रवाना झाली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ८० जणांची चौकशी करण्यात आली असून आता SIT नं आपला मोर्चा गोवा आणि ठाण्याकडे वळवलाय.

यामुळे आता गौरी लंकेश हत्या प्रकरणी कोणता नवा खुलासा समोर येतोय याकडे सा-यांचं लक्ष लागलय. गौरी लंकेश यांची काही दिवसांपूर्वी बंगळुरु इथं त्यांच्या घराजवळ अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती.