तारिक गार्डन इमारत दुर्घटने प्रकरणी दुसरी अटक

इमारत दुर्घटनेत १५ जणांचा बळी गेला होता.

Updated: Aug 29, 2020, 03:34 PM IST
तारिक गार्डन इमारत दुर्घटने प्रकरणी दुसरी अटक title=

रायगड : महाड तारिक गार्डन इमारत दुर्घटना प्रकरणी दुसरी अटक करण्यात झाली आहे. याप्रकरणी युनूस शेख याला पोलिसांनी अटक केली असून त्याला 

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. युनूस शेख हा बिल्डर फारूक काझी याचा सहकारी आहे. यापूर्वी आरसीसी सल्लागार बाबूभाई धामणे याला केली पोलिसांनी अटक केली होती. 

इमारत दुर्घटनेत १५ जणांचा बळी गेला होता. यानंतर जिल्ह्यातील ५३५ धोकादायक इमारतींवर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.