नागपूरमध्ये एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डोंगरगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरांनी लाखोंची रोकड लंपास केली. 

Updated: Jan 12, 2018, 02:45 PM IST
नागपूरमध्ये एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास title=

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डोंगरगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरांनी लाखोंची रोकड लंपास केली. 

नोव्हेंबर महिन्यातही हेच एटीएम फोडून चोरी करण्यात आली होती. गुरूवारी रात्री अज्ञात आरोपींनी एटीएम फोडून रक्कम काढून पळ काढली. किती रक्कम चोरीला गेली याचा तपास पोलीस करताहेत. 

धक्कादायक म्हणजे एकदा चोरी झाल्यानंतर अजूनही या एटीएमला सुरक्षारक्षक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.