माझ्या स्टाईलला शरद पवारांनी दाद दिल्याने आनंद - उदयनराजे भोसले

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये उदयनराजे यांच्या कॉलरचा संदर्भ देत, कोपरखळी मारली होती.

Updated: May 14, 2018, 11:26 AM IST
माझ्या स्टाईलला शरद पवारांनी दाद दिल्याने आनंद - उदयनराजे भोसले title=

कराड : काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये उदयनराजे यांच्या कॉलरचा संदर्भ देत, कोपरखळी मारली होती. पवार यांनी आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलला दाद दिल्याने आनंद झाल्याची भावना उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलीये. माझ्यासाठी शरद पवार आदरणीय आहे. मी मानतो त्यांना. इतक्या वयातही इतकं झोकून काम करणे हे कोणाला जमणार नाही. आजही गेलो तरी सकाळी सातच्या ठोक्याला ते कार्यालयात असतात. त्यांनी माझं अनुकरण केलं. कुणीतरी माझ्या या स्टाईलला दाद दिली यातच आनंद आहे, असं उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले. दरम्यान यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सज्जड दमही भरला. अपक्ष उमेदवारीवरुन एका एकाची पुंगी वाजवू शकतो, अशा शब्दात त्यांनी चपराक लगावली. 

लोकशाही आहे म्हणूनच गप्प आहे राजेशाही असती तर एका एका आमदाराला दाखवले असते. हिम्मत असेल तर मैदानात या... अपक्ष उमेदवारी भरुन एकाएकाची पुंगी वाजवतो की नाही ते बघाच असा इशारा त्यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिला.